Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: पहिल्या T20 सामन्यात 'हा' धाकड घेणार किंग कोहलीची जागा! विस्फोटक फलंदाजीत माहिर

India vs New Zealand 1st T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना आज (27 जानेवारी) रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand 1st T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना आज (27 जानेवारी) रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारताची नजर टी-20 मालिका जिंकण्यावर असेल. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवून टीम इंडियात स्थान मिळवायचे आहे.

विराट कोहलीला टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी 31 वर्षीय युवा खेळाडू फलंदाजीसाठी उतरु शकतो. हा खेळाडू विस्फोटक फलंदाजीत माहिर आहे.

या खेळाडूला संधी मिळू शकते

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 31 वर्षीय राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. राहुल हा विस्फोटक फलंदाजीत माहिर असलेला खेळाडू आहे. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 16 चेंडूत 35 धावांची तुफानी खेळी खेळली होती.

स्फोटक फलंदाजी माहिर

राहुलने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 52 सामन्यांमध्ये 7 शतके आणि 14 अर्धशतकांसह 2728 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याच्या नावावर 53 सामन्यांमध्ये 4 शतके आणि 10 अर्धशतकांसह लिस्ट ए मध्ये एकूण 1782 धावा आहेत. त्याने फर्स्ट क्लासमध्ये 13 आणि लिस्ट ए मध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघ विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक:

पहिला T20 - 27 जानेवारी, रांची

दुसरा T20 - 29 जानेवारी, लखनौ (Lucknow)

तिसरा T20 - 1 फेब्रुवारी, अहमदाबाद

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT