India vs Netherlands | ICC ODI Cricket World Cup 2023 Warm up Match Twitter/BCCI
क्रीडा

World Cup 2023: टीम इंडियाच्या सरावावर पावसाचे पाणी, नेदरलँड्सविरुद्धचा सामना रद्द

India vs Netherlands: भारताचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा दुसरा सराव सामनाही रद्द झाला आहे.

Pranali Kodre

India vs Netherlands ICC ODI Cricket World Cup 2023 Warm up Match abandoned without toss:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारताचा दुसरा सराव सामना मंगळवारी (३ ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे नाणेफेकही न होता रद्द झाला.

तिरुअनंतपुरम येथे मंगळवारी सातत्याने पावसाचा शिडकावा सुरू होता. त्यामुळे मैदान सुकवण्यासाठीही कर्मचाऱ्यांना मेहनत घ्यावी लागत होती. अखेर पाऊस सातत्याने येत असल्याने पंचांनी हा सराव सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, भारताचा ३० सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीला होणारा पहिला सराव सामनाही एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला होता.

तसेच नेदरलँड्सचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी झाला होता. पण या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. त्या सामन्यात २३ षटकात ऑस्ट्रेलियाने ७ बाद १६६ धावा केल्या होत्या, त्यानंतर नेदरलँड्सने १४.२ षटकात ६ बाद ८४ धावा केल्या होत्या. पण पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामनाही रद्द झाला होता.

त्यामुळे आता भारत आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ थेट मुख्य वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत खेळताना दिसतील. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मुख्य स्पर्धेत भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. तसेच नेदरलँड्स पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध हैदराबादला खेळणार आहे.

दरम्यान, पावसामुळे यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तिरुवनंतपुरम येथे होणारा सराव सामनाही नाणेफेक न होता रद्द झाला होता.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सराव सामने ३ ऑक्टोबर रोजी संपणार असून ५ ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धा सुरू होणार आहे.

त्याआधी ४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादला उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यावेळी सर्व १० संघांचे कर्णधार उपस्थित राहतील. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघात अहमदाबादला सलामीचा सामना रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

SCROLL FOR NEXT