World Cup 2023: अरिजीतचा सूर, रणवीरचा ठेका, वर्ल्ड कप 2023 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडचा तडका!

आयसीसी वर्ल्ड कप 2023 (ICC ODI World Cup 2023) चे उद्घाटन काही दिवसात होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे आहे.
ICC ODI World Cup 2023
ICC ODI World Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसी वर्ल्ड कप 2023 (ICC ODI World Cup 2023) चे उद्घाटन काही दिवसात होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्याचवेळी, 4 ऑक्टोबर रोजी, याच स्टेडियममध्ये वर्ल्ड कप उद्घाटन सोहळा होणार आहे, ज्यामध्ये बॉलीवूडचा जलवा पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूडचे अनेक प्रसिद्ध कलाकार उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत. सायंकाळी सात वाजता हा सोहळा सुरु होईल.

दरम्यान, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया उद्घाटन समारंभात आपल्या परफॉर्मन्सने क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करतील.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंह आपल्या जादूई आवाजाने चाहत्यांवर मोहिनी घालतील. याशिवाय, श्रेया घोषाल, संगीतकार आणि गायक शंकर महादेवनही परफॉर्म करणार आहेत.

महादेवन यांनी 2011 क्रिकेट वर्ल्ड कप (World Cup) 'दे घुमाके' चे थीम सॉंग गायले होते, जे खूप पसंत केले गेले. त्यांनी एहसान आणि लॉयसोबत 'दे घुमाके'ची सहनिर्मिती केली होती.

ICC ODI World Cup 2023
World Cup 2023: वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळताच किंग कोहली करणार मोठा कारनामा, क्रिकेटचा देव 'या' लिस्टमध्ये अव्वल!

वर्ल्ड कप सामने राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवले जातील, ज्यामध्ये 10 संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. एका संघाला 9 साखळी सामने खेळावे लागतात. टॉप-4 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

फायनल 19 नोव्हेंबरला होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर 11 ऑक्टोबरला भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

14 ऑक्टोबरला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादमध्ये भिडतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com