Intercontinental Cup: भारताच्या फुटबॉल संघाने पुन्हा एकदा इंटरकॉन्टिनेंटल चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने लेबनॉनचा 2-0 असा पराभव केला. हाफ टाईमपर्यंत उभय संघांमध्ये चुरशीच्या लढतीनंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आणि 21 मिनिटांतच गोल करत आघाडी घेतली.
दरम्यान, भारतीय संघासाठी सुनील छेत्रीने 46 व्या मिनिटाला आणि लल्लियांझुआला छांगटेने 65 व्या मिनिटाला शानदार गोल केला. यानंतर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु राहिली, मात्र लेबनीज संघाला एकही गोल करता आला नाही. अखेर टीम इंडियाने (Team India) हा सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा केला.
अंतिम फेरीत सुनील छेत्रीने शानदार गोल केला. 46 व्या मिनिटाला हा गोल करताना सांघिक कामगिरीचे उत्तम दर्शन घडले. छेत्रीने शानदार पास आणि असिस्ट करत गोलवर शिक्कामोर्तब केले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या.
टीम इंडियाने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. 2018 मध्ये भारतीय संघाने शेवटच्या वेळी ही स्पर्धा जिंकली होती. त्याचवेळी, 2019 मध्ये दक्षिण कोरियाचा (South Korea) संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर भारत चौथ्या स्थानावर राहिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.