बीसीसीआयने (BCCI ) मिताली राज (Mitali Raj), आर. अश्विन (R. Ashwin) यांची नावे खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. एआयएफएने सुनील छेत्री (Sunil Chetri) याचे नाव खेलरत्नसाठी (Khel Ratna) तर अर्जुन (Arjun) पुरस्कारासाठी (award) बाल देवीचे नाव पुढे करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केएल राहुल, जसप्रीत बुमराह, आणि शिखर धवन यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात येतील. तर बीसीसीआयने मिताली राज आणि आर अश्विन यांच्यानावांची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून होती. या पुरस्कारासाठी पात्र खेळाडू, प्रशिक्षक, संस्था, विद्यापीठांकडील अर्ज मागविण्यात आले होते. मंत्रालयाच्या वतीने त्यांना अधिकृत याबाबत ई-मेल करण्यात येईल. मागिल वर्षी खेळ रत्न पुरस्कार मानिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगट, राणी रामपाल आणि मारियाप्पन फणगेवेलू यांना देण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.