Indian Women Team  Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs JAPW: पॅरिस ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं; जपानकडून भारतीय महिला संघाचा लाजिरवाणा पराभव

Manish Jadhav

India Vs Japan Hockey Match: भारतीय महिला हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरु शकला नाही. एफआईएच (FIH) महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत भारताला जपानकडून 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु ते शक्य झाले नाही. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

दरम्यान, हा भारत-जपान सामना शुक्रवारी (19 जानेवारी) रांचीच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात जपानसाठी एकमेव गोल काना उराता हिने खेळाच्या सहाव्या मिनिटात केला. पेनल्टी कॉर्नरवर उराताने हा गोल केला. भारतालाही गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण जपानच्या बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. बघितले तर, सामन्यात भारताला नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकदाही ते गोलपोस्टवर मारु शकले नाहीत. उदिता आणि दीपिका ज्युनियरकडून खूप अपेक्षा होत्या, पण या सामन्यात दोघींचीही कामगिरी निरुत्साही ठरली.

दुसरीकडे, भारतीय महिला हॉकी संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला होता, परंतु त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड आणि इटलीला पराभूत करुन पूल-बीमध्ये दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारताने न्यूझीलंड आणि इटलीविरुद्ध खेळाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली होती, तथापि, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने कात टाकली. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध 3-4 ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आणि जर्मनी यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाल लागला. आता भारताला जपानकडून महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

चौथ्यांदा ऑलिम्पिकला जाण्याचे स्वप्न भंगले

भारतीय महिला हॉकी संघाला चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी होती. भारतीय महिला संघ पहिल्यांदा 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता, जिथे तो चौथ्या स्थानी पोहोचला होता. यानंतर भारतीय महिला संघ रिओ (2016) आणि टोकियो (2020) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. भारतीय संघ रिओमध्ये 12व्या आणि टोकियोमध्ये चौथ्या स्थानी राहिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT