Joe Root Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Eng: जो रुटच्या निशाण्यावर मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड; पहिल्याच कसोटीत सामन्यात...

Joe Root Eyes Sachin Tendulkar Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

Manish Jadhav

Joe Root Eyes Sachin Tendulkar Record: टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. यानंतर टीम इंडियाला इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघांमधला पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रुट महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमावर लक्ष केंद्रित करणार आहे. रुट त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडू शकतो.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत सचिन तेंडुलकरने 53 डावात 2535 धावा केल्या आहेत. याशिवाय, इंग्लंडचा फलंदाज जो रुटने 45 डावात 2526 धावा केल्या आहेत. आता जो रुट सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्यापासून फक्त 9 धावांनी मागे आहे. भारताविरुद्ध 9 धावा केल्यास, जो रुट भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

1. सचिन तेंडुलकर (भारत), 53 डाव- 2535 धावा

2. जो रुट (इंग्लंड), 45 डाव – 2526 धावा

3. सुनील गावस्कर (भारत), 67 डाव- 2483 धावा

4. अॅलिस्टर कुक (इंग्लंड), 54 डाव- 2431 धावा

5. विराट कोहली (भारत), 50 डाव- 1991 धावा

दुसरीकडे, जो रुटला इंग्लंड कसोटी संघाचा आधारस्तंभ म्हटले जाते. रुटने आतापर्यंत इंग्लंडकडून 135 कसोटी सामने खेळले आहेत. रुटच्या नावावर 247 डावांमध्ये 11416 धावा आहेत. या कालावधीत रुटने 30 शतके आणि 60 अर्धशतके केली आहेत. आता पुन्हा एकदा इंग्लंड संघाला रुटकडून अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT