हिरव्यागार खेळपट्टीवर फलंदाजांची मात्र खरी कसोटी लागणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. dainik gomantak
क्रीडा

IND vs ENG Preview: नॉटिंघमच्या हिरव्यागार खेळपट्टी समोर भारतीय फलंदाजांची कसोटी

चेंडू स्विंग होताना त्यावर खेळणे भारतीय फलंदाजांना अडचणीचे जाते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना संयमाने फलंदाजी करावी लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs ENG यांच्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून नॉटिंघममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी आज नॉटिंघमची हिरवी गार खेळपट्टी (Nottingham's green cool pitch) समोर आली आहे. त्यामुळे या हिरव्यागार खेळपट्टीवर फलंदाजांची मात्र खरी कसोटी लागणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

सध्या दोन्ही संघांचा सराव नॉटिंघममध्ये सुरु झाला असून, दोन्ही संघांचे गोलंदाज आणि फलंदाज मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत. विकेटवर असणारे गवत ही न्यूज भारतीय संघासाठी नक्कीच धोक्याची असली तरी भारतीय फलंदाजांना (Indian batsmen) इंग्लंडच्या (England) गोलांदाजांविरोधात फाईट करावी लागणार आहे. कारण चेंडू स्विंग होताना त्यावर खेळणे भारतीय फलंदाजांना अडचणीचे जाते हे आपण कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्यावेळी देखील पाहिले आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना संयमाने फलंदाजी करावी लागणार आहे.

भारतीय संघातील सलामीवीरासह 2 खेळाडू इंग्लंडविध्दच्या मालिकेतून आधीच बाहेर झाले आहेत. त्यांच्या जागी पृथ्वी आणि सूर्यकुमार यांना पाठविण्यात येणार असले तरी ते दोघे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे भारतीय संघ पाहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंत या दोघांचा समावेश करु शकेल. तसेच गोलंदाजीत देखील उमेश यादवचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे (उपकप्तान), हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जड़ेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लोकेश राहुल, रिध्दिमान साहा

पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT