नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) मंडळाचे सचिव जय शह यांनी संघ व्यवस्थापनाने केलेल्या विनंतीला पाठिंबा देत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना इंग्लंडमध्ये (England) भारतीय संघात (Indian team) सामिल होण्यास परवानगी दिली आहे. श्रीलंके विरुध्द दुसऱ्या टी-20 स्पर्धेत भारताच्या कुणाल पांड्याची कोरोना (Covid19) चाचणी पॉझिटीव्ह आल्यावर त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांचा देखील समावेश होता. त्यामुळे या दोघांच्या इंग्लंडदौऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
या सर्व परिस्थितीवर बीसीसीआयचे सचिव जय शहा एएनआयशी हे बोलताना म्हणले, श्रीलंके विरुध्द दुसऱ्या टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना वगळल्यानंतर त्यांच्या इंग्लंडदौऱ्याबाबत मंडळाचे आधिकारी तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाकडून या दोघांना इंग्लंडदौऱ्यावर पाठविण्यात एकमत झाले आहे. हे दोघे कोरोना पॉझिटीव्ह असलेला कुणाल पांड्या याच्या संपर्कात आले होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांची बदली खेळाडू म्हणून नियुक्ती केली होती. पण श्रीलंका दौऱ्यात कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या कुणाल पांड्याच्या संपर्कात आल्याने या दोघांसह भारतीय संघातील 9 खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले. तेथे देखील दोन दिवसानंतर भारताचे खेळाडू यजुवेंद्र चहाल आणि कृष्णप्पा गौतम यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे या दोघांच्या इंग्लंडवारीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. परंतु बीसीसीआयने सर्वांशी चर्चा केल्यानंतर या दोघांचा इंग्लंड दौरा आता पक्का झाला आहे.
इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिल, वॉशिंगटन सुंदर यांच्यासह आणखीन दोन खेळाडू जखमी झाल्याने त्यांनी दौऱ्यातून माघार घेतली. त्यांच्या जागी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना पाठविण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे : भारताचा संघ: रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, isषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, मो. सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.
स्टँडबाय खेळाडू: प्रसिध कृष्णा, अरझन नागवासवाला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.