IND vs BAN, 2nd Test | IND vs BAN Test Match
IND vs BAN, 2nd Test | IND vs BAN Test Match  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 2nd Test: टीम इंडियाची 'टॉप ऑर्डर' कोलमडली! बांगलादेशची मालिका वाचवण्यासाठी शर्थीची झुंज

Pranali Kodre

IND vs BAN, 2nd Test: ढाका येथे बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. शनिवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 23 षटकांत 4 बाद 45 धावा केल्या आहेत. भारताला अद्याप विजयासाठी 100 धावांची गरज आहे.

तिसऱ्या दिवशी बांगलादेशने दुसऱ्या डावात बिनबाद 7 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. पण भारताने दिवसाच्या सुरुवातीलाच बांगलादेशची वरची फळी झटपट बाद केली. यासाठी भारताच्या सर्वच गोलंदाजांनी योगदान दिले.

मात्र, बांगलादेशने 70 धावांत 4 विकेट्स गमावल्यानंतर झाकिर हसन आणि लिटन दास यांनी जोडी जमली होती. त्यांनी बांगलादेशला 100 धावांचा टप्पाही पार करून दिला. मात्र, त्यांची जोडी स्थिरावलेली असतानाच झाकिरला 51 धावांवर उमेश यादवने बाद केले. त्यानंतर लगेचच पुढच्या षटकात मेहदी हसन मिराझही शुन्यावर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

पण तरी लिटन दासने एक बाजू सांभाळून ठेवली होती. त्याला नरुल हसन आणि टस्किन अहमद यांनी चांगली साथ देत बांगलादेशचा डावाला स्थैर्य दिले. लिटन दासने नरुल हसनबरोबर 46 धावांची आणि टस्किन अहमदबरोबर 60 धावांची भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशच्या डावाला स्थैर्य मिळाले.

पण, लिटन दासला 73 धावांवर त्रिफळाचीत करत मोहम्मद सिराजने बांगलादेशला मोठा धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशचा डाव भारतीय गोलंदाजांनी झटपट गुंडाळला. त्यामुळे बांगलादेशला दुसऱ्या डावात 70.2 षटकांत सर्वबाद 231 धावा केल्या. पण पहिल्या डावात 87 धावांची पिछाडी स्विकारली असल्याने बांगलादेशने भारताला 145 धावांचे आव्हान ठेवले.

भारताची वरची फळी कोलमडली

बांगलादेशने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची वरची फळी झटपट बाद झाली. भारताकडून शुभमन गिल आणि केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. पण बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने तिसऱ्याच षटकात केएल राहुलला 2 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

त्यानंतर मेहदी हसन मिराझने चेतेश्वर पुजारा (6), शुभमन गिल (7) आणि विराट कोहली (1) या तिघांना बाद करत भारताला संघर्ष करायला लावला. झटपट विकेट गेल्यानंतर भारताने अक्षर पटेलला चौथ्या आणि जयदेव उनाडकटला सहाव्या क्रमांकावर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीसाठी पाठवले होते.

दरम्यान तिसऱ्या दिवसाखेर भारताकडून अक्षर पटेल 26 धावांवर आणि जयदेव उनाडकट 3 धावांवर नाबाद राहिला.

भारतीय संघ मालिकेत आघाडीवर

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका वाचवण्याचा प्रयत्न बांगलादेशचा आहे. तर दुसरा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT