Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणार पाच T20 मॅचचा थरार! केव्हा अन् कुठे पाहाणार सिरीज, घ्या जाणून

India vs Australia T20 Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून टी२० मालिका सुरु होत आहे.

Pranali Kodre

India vs Australia T20I Series Live Streaming Details:

गुरुवारपासून (23 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया या संघात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन संघात 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवत वर्ल्डकपवर नाव कोरले होते.

यानंतर आता या दोन संघात टी20 मालिका होत आहे. ही मालिका 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान होणार आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.

या मालिकेतील पहिले तीन सामने अनुक्रमे 23, 26 आणि 28 नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. हे सामने अनुक्रमे विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथे होणार आहेत. त्यानंतर डिसेंबरच्या 1 आणि 3 तारखेला अनुक्रमे चौथा आणि पाचवा टी20 सामना नागपूर आणि हैदराबाद येथे रंगणार आहे. 

या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव सांभाळणार आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व मॅथ्यू वेड सांभाळणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचा तपशील

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेचे वेळापत्रक -

    • 23 नोव्हेंबर - पहिला टी20 सामना, विशाखापट्टणम

    • 26 नोव्हेंबर - दुसरा टी20 सामना, तिरुवनंतपुरम

    • 28 नोव्हेंबर - तिसरा टी20 सामना, गुवाहाटी

    • 1 डिसेंबर - चौथा टी20 सामना, नागपूर

    • 3 डिसेंबर - पाचवा टी20 सामना, हैदराबाद

किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेतील सामने?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेतील पाचही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेतील सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेतील सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्पोर्ट्स 18 च्या चॅनेलवर आणि डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर दिसणार आहे. तसेच जियो सिनेमा या ऍप किंवा वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह मोफत प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

    (श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यात उपकर्णधार असेल.)

  • ऑस्ट्रेलिया संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), ऍरॉन हार्डी, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेविस हेडस जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT