Rohit Sharma | Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Video: कर्णधार असावा तर असाच! हिटमॅनचा पुजारासाठी 'त्याग' पाहून बॉलिवूड स्टारही भारवला

Video: रोहितने दिल्ली कसोटीत 100 व्या कसोटी खेळत असलेल्या पुजारासाठी त्याची विकेट बहाल केली होती.

Pranali Kodre

Rohit Sharma Sacrifice his Wicket for Pujara: रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना संपला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियवर झालेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत सध्या 2-0 अशी आघाडीही घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने केलेली एक कृती कौतुकाचे कारण ठरत आहे.

रोहितचा पुजारासाठी त्याग

झाले असे की ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतासमोर 115 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केएल राहुलची विकेट लवकर गमावली होती. पण त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने डाव सांभळण्याचा प्रयत्न केला होता.

या दोघांनी जोडी खेळपट्टीवर स्थिरावली होती. मात्र, सातव्या षटकातील पाचवा चेंडू मॅथ्यू कुहनेमनने फुल लेंथचा टाकला, ज्यावर रोहितने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवला. त्यानंतर रोहित आणि पुजारा यांनी चपळाईने एकेरी धाव पूर्ण केली आणि रोहितने दुसऱ्या धावेसाठीही कॉल दिला. त्यामुळे दोघेही दुसरी धाव घेण्यासाठी धावले.

मात्र, पीटर हँड्सकॉम्बने डीपच्या क्षेत्रात चेंडू पकडला आणि वेगात यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेकडे फेकला. ते पाहून रोहिने दुसरी धाव घेताना पुजाराला मागे जाण्यास सांगितले, पण तोपर्यंत पुजारा नॉन-स्ट्रायकरला जवळपास पोहचलाच होता.

त्यामुळे रोहित क्रिजच्या बाहेर राहिला आणि त्याने आपली विकेट 31 धावांवर असताना बहाल केली. कारण तोपर्यंत कॅरेने स्ट्रायकरच्या बाजूच्या स्टंपवरील बेल्स उडवल्या होत्या.

रोहितने पुजारासाठी त्याच्या विकेटच्या केलेल्या त्यागाचे सध्या कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानेही रोहितचे कौतुक केले आहे. त्याने ट्वीट केले आहे की 'रोहितने पुजारासाठी जे केले, त्याला नेतृत्व म्हणतात.'

विषेश म्हणजे पुजाराचा हा 100 वा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याच्यासाठी हा खास सामनाही होता. या सामन्यात पुजाराला विजयी धाव घेण्याचीही संधी मिळाली. त्याने 27 व्या षटकात चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तो रिकी पाँटिंगनंतर 100 व्या कसोटी विजयी धाव घेणारा दुसराच फलंदाज आहे. पाँटिंगने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळताना ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव घेतली होती.

दिल्ली कसोटीत दुसऱ्या डावात 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुजारा 31 धावांवर नाबाद राहिला. तसेच केएस भरत 23 धावांवर नाबाद राहिला. रोहितच्या विकेटनंतर विराट कोहली 20 धावांवर आणि श्रेयस अय्यर 12 धावांवर बाद झाले होते.

दरम्यान, आता भारताने 2-0 अशी आघाडी मालिकेत घेतली असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखली आहे. आता या मालिकेतील पुढील सामना इंदोरला 1 ते 5 मार्चदरम्यान खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT