Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' दिग्गजाला मिळाली संधी

India vs Australia ODI Squad: एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Manish Jadhav

India vs Australia ODI Squad: एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे याची घोषणा केली.

'हा' दिग्गज खेळाडू संघात सामील झाला

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विनची संघात एन्ट्री झाली आहे.

अश्विनच्या समावेशामुळे संघ आणखी मजबूत झाला आहे. अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. आशिया कप दरम्यान अक्षर जखमी झाला होता.

आशिया कपसाठी निवडलेले जवळपास सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका खेळणार आहेत. मात्र, अक्षर कांगारुंविरुद्ध खेळणार नाही.

पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनी , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. सर्व सामने मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे होणार आहेत. OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर ODI मालिकेचे सामने विनामूल्य स्ट्रीम केले जातील.

भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक

22 सप्टेंबर 2023 - पहिला वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

24 सप्टेंबर 2023 - दुसरा वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

27 सप्टेंबर 2023 - तिसरा वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT