IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 22 सप्टेंबरपासून सुरु होणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका विविध कारणांमुळे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यासाठी लिटमस टेस्टपेक्षा कमी नसेल.
अय्यरच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे, तर सूर्यकुमारला विश्वचषक संघातील आपली निवड चांगली कामगरी करुन सिद्ध करावी लागेल. संघ व्यवस्थापन मात्र अय्यरच्या प्रगतीवर अधिक लक्ष ठेवेल.
मधल्या फळीतील या फलंदाजाने नेटमध्ये सुमारे अर्धा तास सराव केला आणि नंतर 15 मिनिटे क्षेत्ररक्षण केले, ज्यामुळे श्रीलंकेविरुद्ध आशिया कप फायनलमध्ये खेळण्याची शक्यता वाढली होती.
तथापि, अय्यरने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या सामन्यात त्याने 14 धावा केल्या.
नेपाळविरुद्धच्या (Nepal) सामन्यातही त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता पण त्यानंतर त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
संघाशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, 'ही मालिका (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असेल कारण त्याला सामन्यात संपूर्ण वेळ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावे लागेल.
दुखापतीतून परतल्यानंतर त्याने अद्याप हे केलेले नाही. त्याची प्रगती चांगली आहे पण संघ व्यवस्थापनाला त्याची घाई नाही असे दिसते.'
दुसरीकडे, सूर्यकुमारच्या T-20 फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे, परंतु तो अद्याप एकदिवसीय सामन्यांमध्ये म्हणावी तशी कामगिरी करु शकलेला नाही.
आशिया चषकात त्याला बांगलादेशविरुद्ध संधी देण्यात आली होती, पण तो 34 चेंडूत केवळ 26 धावा करु शकला. बॉल वळत असताना त्याने अधिक स्वीप शॉट्स आणि जोखमीचे शॉट्स खेळल्यामुळे त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीवर संघ व्यवस्थापनही खूश नाही.
संघ व्यवस्थापनाकडे केएल राहुल (KL Rahul) आणि इशान किशनसारखे फलंदाज आहेत, पण सूर्यकुमारला वनडे संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर चांगली कामगिरी करावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.