Hardik Pandya | Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: वनडे क्रिकेटमध्ये भारत की ऑस्ट्रेलिया कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या रेकॉर्ड्स

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत असून आत्तापर्यंत या दोन संघात झालेल्या सामन्यांमध्ये कोण वरचढ राहिले आहे, हे जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia ODI: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता या दोन संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यानंतर दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणमला आणि तिसरा सामना 22 मार्चला चेन्नईला होणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत हे दोन्ही संघ अनेकदा वनडेत आमने सामने आले आहेत. त्यात कोण वरचढ ठरलेय यावर एक नजर टाकू.

आमने सामने कामगिरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंत एकमेकांविरुद्ध 143 वनडे सामने खेळले आहेत. यातील 53 सामने भारताने जिंकले आहेत, तर 80 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तसेच 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

त्याचबरोबर भारतात झालेल्या सामन्यांबद्दल आकडेवारी पाहिली, तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 64 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये 29 सामने भारताने आणि 30 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

सर्वाधिक धावा आणि विकेट्स

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत 3077 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 2208 धावा केल्या आहेत, तर 2164 धावांसह रिकी पाँटिंग या यादीत तिसऱ्या आणि 2083 धावांसह विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर ब्रेट ली आहे. त्याने 55 विकेट्स भारताविरुद्ध वनडेत घेतले आहेत. सध्या दोन्ही संघात खेळत असलेल्या गोलंदाजांपैकी एकही जण या यादीत अव्वल 10 जणांमध्ये नाही.

सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये या यादीत सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीच्या नावावर आहेत. त्याने 29 विकेट्स घेतल्या असून त्याच्यापाठोपाठ 28 विकेट्ससह रविंद्र जडेजा आणि 27 विकेट्ससह ऍडम झम्पा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: ‘ग्रीन सेस’ मुद्द्यावर आलेमाओ यांनी केला मुद्दा उपस्थित

Goa Filmcity: गोवा फिल्म सिटीच्या नावाखाली 'बाहेरच्या' कलाकारांना, तंत्रज्ञांना प्रस्थापित करण्याची योजना तर नाही ना?

Goa Politics: विधानसभा कामकाजावेळी, सरकारी कार्यालयातील टेबले 'रिकामी' का असतात?

Team India Record: अखेर भारतानं करून दाखवलं! 148 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या नावावर असलेल्या 'या' विश्वविक्रमावर भारताचा कब्जा

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

SCROLL FOR NEXT