India vs Australia X
क्रीडा

IND vs AUS: तेव्हा ऑस्ट्रेलिया अन् आता भारत? 2003 आणि 2023 वर्ल्डकप फायनलमध्ये अजब योगायोग

World Cup Final: 2003 च्या वर्ल्डकपशी साम्य सांगणारे काही योगायोग 2023 वर्ल्डकप फायनलपूर्वी समोर आले आहेत.

Pranali Kodre

India vs Australia ICC Cricket World Cup 2003 and 2023 Final coincidence:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना रंगणार आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा 20 वर्षांनी चाहत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आनंद घेता येणार आहे. 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2003 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमने-सामने आले होते.

जोहान्सबर्गला झालेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवत तिसऱ्यांदा वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली होती. हा ऑस्ट्रेलियाचा त्या स्पर्धेतील सलग 11 वा विजय होता.

दरम्यान, आता पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येणार आहेत. पण यावेळीही 2003 च्या वर्ल्डकपशी काहीसे साम्य सांगणारे योगायोग समोर आले आहेत. याबद्दल सारंग भालेराव नावाच्या युझरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. काय आहेत हे योगायोग यावर एक नजर टाकू.

2003 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सलग 10 सामने जिंकले होते, तसेच भारताने सलग 8 सामने जिंकले होते. याचप्रमाणे 2023 वर्ल्डकपमध्ये भारताने अंतिम सामन्यापूर्वी सलग 10 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने सलग 8 सामने जिंकले आहेत.

त्याचबरोबर 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता. तर भारतीय संघाचाही हेतू तिसरा वर्ल्डकप जिंकण्याचा आहे. आता भारतीय संघ तिसरा वर्ल्डकप जिंकून हा योगायोग पूर्ण होणार की ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकप उंचावणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात

भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, तर ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताने यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे, त्यातील 1983 आणि 2011 साली विजय मिळवला आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT