India vs Australia | 4th Test Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: कहर चाहता! Gill च्या षटकाराने चेंडू हरवला, पण पठ्ठ्यानं कव्हरच्या आत शिरून शोधून काढला

India vs Australia: अहमदाबाद कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात एक मजेशीर घटना घडली, गिलच्या षटकारामुळे हरवलेला चेंडू एका चाहत्याने कव्हर्समधून शोधून काढला.

Pranali Kodre

India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथे कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (9 मार्च) सुरू झाला. शुक्रवारी या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात एक गमतीशीर घटना घडली.

झाले असे की भारताने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपवला. त्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या दिवसाखेर 10 षटके फलंदाजी करायची होती. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनीही काही चांगले शॉट मारले.

दरम्यान, अखेरच्या षटकावेळी म्हणजे भारताच्या डावातील 10 व्या षटकात नॅथन लायन गोलंदाजी करत होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर गिलने जोरदार षटकार मारला. त्यामुळे चेंडू थेट साईट स्क्रिनच्या मागे गेला. ते क्षेत्र कव्हरने पूर्ण झाकण्यात आले होते.

त्यामुळे मधे काही काळ गेला. त्यानंतर चेंडू हरवला असल्याचे समजून पंचांनी नवीन चेंडूची मागणी केली. पण त्याचदरम्यान, एका प्रेक्षकाने चक्क त्या कव्हर केलेल्या क्षेत्रात जाण्याचं धाडस केलं. त्याने तिथे जाऊन तो चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला. तो प्रेक्षक चक्क कव्हरच्या आत शिरला आणि त्याने तो चेंडू शोधूनच काढला. त्याने चेंडू शोधल्यानंतर तिथे जल्लोषही केला.

पण, मैदानात खेळ सुरू करण्याचा पंचांनी इशारा केला. मात्र गोलंदाजाच्या मागून काहीतरी मध्ये येत असल्याचे गिलच्या लक्षात आले. त्यानंतर पंचांनी त्या प्रेक्षकाच्या प्रयत्नांचा सन्मान करत त्याची शोध मोहिम संपवण्याचा इशारा केला.

मात्र, प्रेक्षकाला इतका आनंद झाला होता की त्याने सेलिब्रेशन पाहून मैदानातील खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही. अखेर तो प्रेक्षक आपल्या जागेवर गेला आणि हे षटकही पूर्ण झाले.

भारताने 10 षटकात बिनबाद 36 धावा केल्या. शुभमन गिल 18 आणि रोहित शर्मा 17 धावांवर नाबाद आहे. तसेच अद्याप भारतीय संघ 444 धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतके साजरी केली.

ख्वाजाने 422 चेंडूत खेळताना 180 धावांची खेळी केली. तसेच ग्रीनने 170 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याचबरोबर तळात टॉड मर्फीने 41 आणि नॅथन लायनने 34 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 167.2 षटकात सर्वबाद 480 धावा केल्या. 

भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

SCROLL FOR NEXT