Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: कसोटी शतकासाठी 1205 दिवसच नाही, तर 41 डाव अन् 2633 चेंडूंचीही प्रतिक्षा; रेकॉर्ड्स पाहाच

Pranali Kodre

Virat Kohli Test Century: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 128 धावांची शतकी खेळी केली. तो बाद झाल्यानंतर विराटने भारताच्या डावाची जबाबदारी घेतली.

त्याने आधी रविंद्र जडेजा (28) आणि मग केएस भरतला (44) साथीला घेतले. हे दोघेही बाद झाल्यानंतर त्याला अक्षर पटेलने चांगली साथ दिली. यादरम्यान विराटने 241 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने त्याचे शतर पूर्ण केले.

त्याने भारताच्या पहिल्या डावात 139 च्या षटकात नॅथन लायनविरुद्ध एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे आणि कसोटी क्रिकेटमधील 28 वे कसोटी शतक आहे.

विराटची प्रतिक्षा संपली...

दरम्यान, विराटने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 1205 दिवसांनी कसोटी शतक केले आहे. यापूर्वी त्याने त्याचे अखेरचे म्हणजेच 27 वे कसोटी शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानात केले होते. त्यानंतर गेल्या तीन वर्षात त्याने 6 अर्धशतके केली, पण त्याला शतक करता आले नव्हते.

विराटने 27 व्या शतकानंतर 28 वे शतक करण्याच्या कालावधी दरम्यान 41 डाव खेळले. यापूर्वी त्याला दोन शतकांच्या मध्ये सर्वाधिक प्रतिक्षा केवळ 11 डावांची करावी लागली होती. त्याला 11 व्या शतकानंतर 12 वे शतक करण्यासाठी 11 डाव खेळावे लागले होते.

इतकेच नाही, तर 27 व्या शतकानंतर 28 व्या शतकापर्यंत पोहण्याच्या कालावधीत विराटने तब्बल 2633 चेंडूंचा सामना केला. तसेच या कालावधीत त्याचे कसोटी फलंदाजी सरासरीने 25.70 होती.

फॅब फोरची आकडेवारी

विशेष म्हणजे त्याने 27 वे कसोटी शतक केले होते, त्यावेळी त्याच्याबरोबर तुलना होत असलेले आणि सध्याच्या फॅब फोरमध्ये गणले जाणारे जो रुट, केन विलियम्सन आणि स्टिव्ह स्मिथ हे बऱ्यापैकी त्याच्या मागे होते.

मात्र, विराटला 27 व्या शतकानंतर 28 वे करण्यासाठी लागलेल्या कालावधीत जो रुटची कसोटी सरासरी 53, केन विलियम्सनची 56 आणि स्टीव्ह स्मिथची 48 इतकी राहिली.

तसेच या कालावधीत जो रुटने तब्बल 13 शतके केली. जेव्हा विराटने 27 कसोटी शतके केली होती, त्यावेळी कसोटीत रुटच्या नावावर 16, स्मिथच्या नावावर 26 आणि केन विलियम्सनच्या नावावर 20 शतके होती. आणि आता रुटच्या नावावर 29, स्मिथच्या नावावर 30 आणि विलियम्सनच्या नावावर 26 कसोटी शतके आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विराटने त्याची 75 आंतरराष्ट्रीय शतके वेगवेगळ्या 46 ठिकाणी केली आहेत. त्याच्यापेक्षा केवळ सचिन तेंडुलकरने अधिक ठिकाणांवर खेळताना शतके केली आहेत. सचिनने वेगवेगळ्या 53 ठिकाणी खेळताना शतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Today's Live News: 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि 5 हजार कोटी स्टार्ट-अप फंड, काँग्रेसची वचनबद्धता - एल्टन डिकोस्ता

मलेशियाच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत KFC ने बंद केली आउटलेट्स

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT