Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कोण मारणार चिन्नास्वामीचं मैदान; कसं आहे RCB च्या होम ग्राऊंडचं ट्रॅक रेकॉर्ड?

IND vs AUS 5th T20: आता शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन मालिका 4-1 अशी खिशात घालायची आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 5th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने आधीच 3-1 अशी आघाडी घेतली आहे. आता शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन मालिका 4-1 अशी खिशात घालायची आहे. या मालिकेत भारतीय फलंदाज आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. प्रत्येक सामन्यात भारतीय फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय फलंदाज मैदानात धमाल करण्यास सज्ज झाले आहेत.

दरम्यान, बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने इथे 6 सामने खेळले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने फक्त 2 सामने जिंकले आहेत आणि तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाने इथे दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. हा रेकॉर्ड पाहता ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसतो. या मैदानावरील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाची सर्वोच्च धावसंख्या 202 आहे. जी टीम इंडियाने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती आणि हा सामना 75 धावांनी जिंकला होता.

या मालिकेत टीम इंडिया 3-1 ने पुढे आहे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे. पहिल्यांदाच त्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले असून सूर्याने आपल्या नेतृत्वाखाली टीमला पहिली टी-20 मालिकाही जिंकून दिली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने केवळ तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला होता, याआधी भारताने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यानंतर मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT