Matthew Kuhnemann Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाला कसं आणलं जेरीस? कुहनेमन म्हणतो, 'मी जडेजा आणि अश्विन...'

इंदूर कसोटीत टीम इंडियाविरुद्ध 5 विकेट्स घेणाऱ्या कुहनेमनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरला बुधवारी सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाचा नवोदित फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन चमकला. त्याने पहिल्या डावात 16 धावांत भारताचे 5 फलंदाज बाद केले. दरम्यान, त्याने भारताच्या रविंद्र जडेजाचा आदर्श घेतला असल्याचे स्पष्ट केले.

कुहनेमनने रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि आर अश्विन यांना बाद केले. त्यामुळे भारताचा पहिला डाव केवळ 109 धावांत संपवण्यास ऑस्ट्रेलियाला यश मिळाले.

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर कुहनेमन गमतीने म्हणाला, 'मागील कसोटीनंतर मी जडेजाला विचारले होते की तू मला काही सल्ले देशील का? त्यावर त्याने मला उत्तर दिले होते की हो, पण मालिका संपल्यानंतर.'

कुहनेमनने सांगितले की 'मी जडेजा आणि अश्विन यांचा मोठा चाहता आहे. त्यामुळे मी त्यांनी गेल्या काही वर्षात कशी गोलंदाजी केली आहे, हे पाहिले. ज्याप्रकारे जडेजा क्रिजचा वापर करतो आणि दिल्ली कसोटीनंतर मी महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे तो चेंडू जुना झाला की त्याची चेंडू टाकण्याची लेंथ थोडी मागे घेतो. याच महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ज्या मला दुसऱ्या कसोटीतून शिकायला मिळाल्या. त्याचाच वापर या कसोटी सामन्यात केला.'

'मी माझ्या लेंथवर काम केले. फुल लेंथला चेंडू टाकण्याचे टाळले, विशेषत: या खेळपट्टीवर चेंडू खाली राहत होता. त्यामुळे मी त्या 5-6 मीटरच्या लेंथवर सातत्याने गोलंदाजी केली.'

याशिवाय कुहनेमनने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात जागा मिळणे आणि दिग्गज खेळाडूंबरोबर खेळायला मिळणे स्वप्नवत आहे.

खरंतर कुहनेमनचा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश नव्हता. या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान तो ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता. मात्र दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू मिशेल स्विप्सन पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला. त्यामुळे कुहनेमनला ऑस्ट्रेलिया संघात जागा मिळाली.

तो तातडीने भारतात परतला आणि दिल्लीला झालेल्या दुसऱ्या कसोटीतून त्याने पदार्पणही केले. पदार्पणातच त्याने विराट कोहलीला बाद करत पहिली कसोटी विकेट मिळवली होती. त्यानंतर आता त्याने इंदूर कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. यावेळी त्याचे वडील देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Project: 'भूतानी'विरुद्ध गोमंतकीयांची एकजूट! आंदोलनातून देणार इशारा; उपोषणाला राज्यातून वाढता प्रतिसाद

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

SCROLL FOR NEXT