Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 3rd Test: पहिल्या दिवशी फिरकीपटूंचेच 'राज्य'! भारतीय फलंदाज फ्लॉप, तर ऑस्ट्रेलिया आघाडीवर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील इंदूर कसोटीचा पहिला दिवस संपला असून या दिवशी फिरकीपटूंचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून आले.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी फिरकी गोलंदाजांच दबदबा राहिला. पहिल्या दिवसात एकूण 14 विकेट्स पडल्या. विशेष म्हणजे या सर्व 14 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या.

भारतीय संघाला पहिल्या डावात 109 धावांवर सर्वबाद केल्यानंतर पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 54 षटकात 4 बाद 156 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 47 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या दिवसाखेर पीटर हँड्सकॉम्ब 7 धावांवर आणि कॅमेरॉन ग्रीन 6 धावांवर नाबाद आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड सलामीला फलंदाजीसाठी आले होते. पण ट्रेविस हेडला दुसऱ्याच षटकात भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने 9 धावांवर पायचीत केले. त्यानंतर जडेजाने मार्नस लॅब्युशेनलाही स्वस्तात बाद केले होते, पण तो चेंडू नो-बॉल ठरल्याने लॅब्युशेनला जीवदान मिळाले.

या जीवदानाचा फायदा घेण्याचा त्याने आणि ख्वाजाने प्रयत्न केला. पहिल्या विकेटनंतर या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला स्थिरता दिली. अखेर त्यांच्या जोडी जडेजानेच तोडली. त्याने लॅब्युशेनला 31 धावांवर 35 व्या षटकात त्रिफळाचीत केले.

तसेच अर्धशतक केलेल्या ख्वाजालाही जडेजानेच 43 व्या षटकात माघारी धाडले. ख्वाजा 147 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही फार काळ जडेजाने टीकू दिले नाही. त्याने त्याला 49 व्या षटकात 26 धावांवर बाद केले. दरम्यान, पहिल्या दिवशी जडेजाव्यतिरिक्त भारताच्या अन्य गोलंदाजांना विकेट्स मिळाल्या नाहीत.

तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी भारताला पहिल्या तासातच मोठे धक्के दिले. भारताने पहिल्या 5 विकेट्स केवळ 45 धावांवर गमावल्या होत्या.

कुहनेमनने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना बाद केले, तर लायनने चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजा यांचा अडथळा झटपट दूर केला. त्याचबरोबर कुहनेमनने श्रेयस अय्यरलाही दुसराच चेंडू खेळत असताना शुन्यावर माघारी धाडले.

यानंतर विराट कोहली आणि श्रीकर भारतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण विराटला 22 धावांवर टॉड मर्फीने बाद करत भारताला सहावा धक्का दिला. त्यानंतर पुन्हा कुहनेमन आणि लायनने भारताची तळातली फलंदाजी धोकादायक ठरणार नाही, याची काळजी घेतली.

भरतला 17 धावांवर लायनने पायचीत पकडले. तरी उमेश यादवने काही आक्रमक शॉट खेळताना 13 चेंडूत 17 धावा केल्या. पण त्याला आणि आर अश्विनला कुहनेमनने बाद केले. तर मोहम्मद सिराज धावबाद झाला आणि भारताचा डाव 33.2 षटकात 109 धावांवर संपुष्टात आला. अक्षर पटेल 12 धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 3 विकेट्स घेतल्या, तर टॉड मर्फीने 1 विकेट घेतली. विशेष म्हणजे हे तिघेही फिरकीपटू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT