India vs Australia 3rd Test
India vs Australia 3rd Test Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 3rd Test: कांगारुंच्या फिरकीने भारतीय बॅट्समनला नाचवले, तासाभरातच अर्धी टीम इंडिया गारद

Pranali Kodre

India vs Australia: बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. पण, सामन्याच्या पहिल्याच तासात भारतीय संघ संकटात सापडलेला दिसला.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सुरुवातीलाच भारतीय फलंदाजी कोलमडली. भारताने पहिल्या तासाभरातच 45 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या.

पहिल्याच षटकात मिशेल स्टार्कने रोहितला पेचात पाडले होते. त्याला त्याने पहिल्याच चेंडूवर बाद केले होते, मात्र पंच नितीन मेनन यांनी नाबाद दिल्याने आणि ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू न घेतल्याने रोहितला जीवदान मिळाले. त्यानंतरही एकदा पायचीतसाठी त्याच्याविरुद्ध अपील झाले होते.

पण त्यानंतर रोहित आणि शुभमन गिल या सलामी जोडीने चांगला खेळ करण्यास सुरुवात केली होती. मात्र, सहाव्या षटकात मॅथ्यू कुहनेमनच्या गोलंदाजीवर रोहित 12 धावांवर यष्टीचीत झाला. त्यानंतर 18 चेंडूत 21 धावा करणाऱ्या शुभमन गिललाही कुहनेमननेच माघारी धाडले. गिलचा झेल स्टीव्ह स्मिथने घेतला.

यानंतरही ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाची मधली फळीही स्थिरावणार नाही, याची काळजी घेतली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने 9 व्या षटकात चेतेश्वर पुजाराला एका धावेवर त्रिफळाचीत केले, तर 11 व्या षटकात लायननेच रविंद्र जडेजालाही 4 धावांवर कुहनेमनच्या हातून झेलबाद केले.

पुढच्याच षटकात कुहनेमनने श्रेयस अय्यरला शुन्यावर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. यामुळे 12 षटकातच अर्धा संघ तंबुत परतल्याने भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये दबावाची परिस्थिती होती.

दरम्यान, यानंतर विराट कोहलीने यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 25 धावांची भागीदारी केली. मात्र 22 व्या षटकात विराट कोहलीला टॉड मर्फीने पायचीत पकडले. विराटने रिव्ह्यूची मागणी केली होती. पण त्यात तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विराटला 22 धावांवर विकेट गमवावी लागली.

भरतही नंतर फार काळ टिकला नाही आणि त्याने 25 व्या षटकात लायनच्या विरुद्ध खेळताना 17 धावांवर विकेट गमावली. लायनने त्याला पायचीत केले.

त्यामुळे भारताची अवस्था पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संपले तेव्हा 26 षटकात 7 बाद 84 धावा अशी झाली होती. तसेच अक्षर पटेल 6 धावांवर आणि आर अश्विन 1 धावेवर खेळत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT