Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 3rd Test: केएल राहुल, शमीला वगळले! 'या' खेळाडूंना मिळाली टीम इंडियाच्या Playing XI मध्ये संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद शमी आणि केएल राहुल यांना वगळण्यात आले आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना इंदूरला बुधवारपासून (1 मार्च) सुरू होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना संघातून वगळण्यात आले असून त्यांच्याऐवजी अनुक्रमे शुभमन गिल आणि उमेश यादव यांना प्लेइंग इलेव्हन संधी मिळाली आहे.

केएल राहुल गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मशी झगडत होता, त्यामुळे त्याला वगळले जाईल अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. अखेर रोहितने नाणेफेकीवेळी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच रोहितने सांगितले आहे की शमीला विश्रांती देण्यात आली आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही दोन बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आई आजारी असल्याने मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिशेल स्टार्कला संधी मिळाली आहे.

तसेच दुखापतीमुळे मायदेशी परतलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागेवर कॅमेरॉन ग्रीनला संधी देण्यात आले आहे. त्याचबरोबर कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला तिसरा कसोटी सामना जिंकून किंवा अनिर्णित राखूनही मालिका आपल्या नावे करता येणार आहे. पण ऑस्ट्रेलियाला मालिका पराभव वाचवण्यासाठी या सामन्यात विजय गरजेचा आहे.

याशिवाय हा सामना जिंकला तर भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील स्थानही पक्के करेल. तर ऑस्ट्रेलियालाही सामना जिंकून कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील स्थानही पक्के करण्याची संधी आहे.

इंदूर कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संघ - उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT