Rohit Sharma | MS Dhoni
Rohit Sharma | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: चेन्नईत धोनीला मागे टाकण्याची हिटमॅनला सुवर्णसंधी, फक्त कराव्या लागणार 'इतक्या' धावा

Pranali Kodre

Rohit Sharma can break MS Dhoni's big record: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी (22 मार्च) होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला एक मोठा विक्रम करत एमएस धोनीला मागे टाकण्याची संधी आहे.

या सामन्यात जर रोहितने 66 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू ठरेल. तसेच तो एमएस धोनीलाही मागे टाकेल.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 535 सामन्यांमधील 523 डावांत 44.74 च्या सरासरीने 17092 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 15 शतकांचा आणि 108 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच रोहितच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 439 सामन्यांमधील 458 डावात 42.78 च्या सरासरीने 17027 धावा आहेत. त्याने आत्तापर्यंत 43 शतके केली असून 91 अर्धशतके केली आहेत. तसेच सध्या रोहित भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनीच्या पाठोपाठ सहाव्या क्रमांकावर आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (21 मार्चपर्यंत)

34357 धावा - सचिन तेंडुलकर (664 सामने)

25268 धावा - विराट कोहली (496 सामने)

24064 धावा - राहुल द्रविड (504 सामने)

18433 धावा - सौरव गांगुली (421 सामने)

17092 धावा - एमएस धोनी (535 सामने)

17027 धावा - रोहित शर्मा (439 सामने)

तिसरा सामना निर्णायक सामना

चेन्नईत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण या मालिकेतील मुंबईला झालेला पहिला सामना भारतीय संघाने विजय मिळवला होता. तसेच विशाखापट्टणमला झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

त्याचमुळे बुधवारी चेन्नईत होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो मालिकाही नावावर करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Worms In Water: नळाच्या पाण्यात सापडल्या आळ्या, आजोशी-मंडूर येथील अनेकांची तब्येत बिघडली

Goa News : गोव्यात ७६.९९ मतदान टक्केवारीने रचला नवा विक्रम; निवडणूक आयोगाची अंतिम आकडेवारी

Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या ताजे भाव

Loksabha Election Voting : मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा टक्का अधिक

Panaji News : काँग्रेसचा विजयी दावा; भाजप म्हणतोय, फायदा आम्हालाच

SCROLL FOR NEXT