Rohit Sharma Dance: मेव्हण्याच्या लग्नात रो'हिट'! पत्नी रितीकाबरोबर थिरकताना व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्मा नुकताच त्याच्या मेव्हण्याच्या लग्नसोहळ्यात सामील झाला होता. या सोहळ्यात डान्स करतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma Dance
Rohit Sharma DanceDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Dance: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारी (17 मार्च) पहिला वनडे सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थित होता. आता त्याच्या न खेळण्यामागील कारण समोर आले आहे.

खरंतर रोहित कौटुंबिक कारणामुळे पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचे यापूर्वीच बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता ते कारण समोर आले आहे. रोहितच्या मेव्हण्याचा म्हणजेच कुणाल सजदेहचा लग्नसोहळा नुकताच पार पडला असून यामध्ये रोहितही सामील झाला होता.

या लग्नसोहळ्यात डान्स करतानाचा रोहितचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित त्याची पत्नी रितीका सजदेहसह डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर युजर्सने विविध कमेंट्स केल्या आहेत.

काही युजर्सने म्हटले आहे की 'रोहितने इथेही त्याचे फुटवर्क किती चांगले आहेत, हे दाखवले.' तसेच काहींनी म्हटले आहे की त्याचे सर्वोत्तम मुव्हज तो दाखवत आहे.

Rohit Sharma Dance
Rohit Sharma साठी जडेजा, सिराज, अश्विनने कॅप्टन्सीही केली कठीण, जेवतानाही करावा लागतोय विचार; Video

रोहित ऐवजी हार्दिक कर्णधार

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित शर्मा खेळला नसल्याने मालिकेसाठी उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याने नेतृत्वाची जबाबदारी पार पडली. तसेच रोहितच्या जागेवर ईशान किशनची शुभमन गिलबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी निवड झाली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहित जरी पहिला सामना खेळला नसला, तरी तो दुसऱ्या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणमला आणि 22 मार्चला तिसरा सामना चेन्नई येथे होणार आहे. या दोन्ही सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करताना दिसेल.

Rohit Sharma Dance
Rohit Sharma Video: कर्णधार असावा तर असाच! हिटमॅनचा पुजारासाठी 'त्याग' पाहून बॉलिवूड स्टारही भारवला

रोहित करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व

या वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स त्यांचे घरचे सात सामने घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळताना दिसणार आहे.

या हंगामात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com