Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 3rd ODI: चेन्नईत पाऊसच खेळणार खेळ? जाणून घ्या Weather अपडेट्स

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईमध्ये बुधवारी तिसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान कसे वातावरण असेल जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी (22 मार्च) तिसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.

दरम्यान, सध्या भारतात अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे, त्याचा परिणार या सामन्यावर पण होणार का असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

गेल्या काही दिवसात चेन्नईतही पाऊस झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडेवरही पावसाचे संकट आहे. तरी हवामान अंदाजानुसार दिवसा 33 डिग्री सेल्सियसच्या आसपास तापमान राहिल. तसेच दिवसभर बहुतेक सूर्यप्रकाश असेल.

पण तरी चेन्नईतील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर संध्याकाळी मात्र आकाश निरभ्र राहणार असून पावसाची शक्यता नाही. त्यामुळे या सामन्यात फार मोठा पावसाचा अडथळा येण्याची शक्यता कमी आहे.

निर्णायक सामना

चेन्नईत होणारा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे. कारण तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील मुंबईला झालेला पहिला वनडे सामना भारताने जिंकला होता. तर विशाखापट्टणमला झालेला दुसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सध्या दोन सामन्यांनंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झालेली आहे.

त्याचमुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो संघ ही मालिकाही जिंकणार आहे. ही मालिका यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. तसेच आयपीएल 2023 पूर्वी होणारी भारताची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे.

भारतीय संघात बदलाची शक्यता कमी

दरम्यान, तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. दुसऱ्या सामन्यात खेळलेला संघच तिसऱ्या सामन्यातही खेळताना दिसू शकतो.

यातून निवडली जाईल भारताची प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT