Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: श्रेयसचं कमबॅक, तर सुर्या आऊट! दुसऱ्या कसोटीसाठी पाहा दोन्ही संघांची Playing XI

Pranali Kodre

India vs Australia, 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (१७ मार्च) सुरू झाला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याला गेल्या महिन्यात पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला जवळपास एक महिनाभर क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. तसेच त्याला नागपूरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पहिला कसोटी सामन्यालाही मुकावे लागले होते.

पण, दिल्लीला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो भारतीय संघात सामील झाला असून आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्याने सूर्यकुमार यादवला बाहेर करण्यात आले आहे. सूर्यकुमारने पहिल्या कसोटीतून कसोटी पदार्पण केले होते. मात्र, आता त्याला दुसरा सामना खेळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करण्यात आले आहे. त्यांच्या संघाकडून मॅथ्यू कुहनेमनने कसोटी पदार्पण केले आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू मिशेल स्विप्सन त्याच्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतल्याने कुहनेमनला बोलावण्यात आले होते. आता त्याला पदार्पणाची संधीही देण्यात आली आहे.

याशिवाय मॅट रेनशॉ ऐवजी ट्रेविस हेडला ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियन संघ - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT