IND vs AUS match Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

India vs Australia ODI highlights: या पराभवामुळे भारतीय संघाचा ॲडलेड ओव्हलवर असलेला १७ वर्षांचा दबदबा संपुष्टात आला आहे

Akshata Chhatre

India lost at Adelaide: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवार (दि. २३) ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २ विकेट्सने पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

या पराभवामुळे भारतीय संघाचा ॲडलेड ओव्हलवर असलेला १७ वर्षांचा दबदबा संपुष्टात आला आहे. या मैदानावर भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय सामना १७ वर्षांपूर्वी गमावला होता. त्यानंतर या स्टेडियमवर भारताने चार विजय आणि एक बरोबरी नोंदवली होती.

आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २६४ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांनी महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

तसेच, अखेरच्या षटकांत अक्षर पटेलने केलेली जलद फलंदाजीही उपयुक्त ठरली. मात्र, इतर फलंदाजांना मोठी भागीदारी करता न आल्याने आणि नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

कोहलीचा फॉर्म चिंतेत; सलग दुसरा 'डक'

भारतीय डावातील सर्वात मोठी निराशा माजी कर्णधार विराट कोहलीने केली. कोहली आज पुन्हा अपयशी ठरला आणि त्याने केवळ चार चेंडू खेळत शून्यावर (डक) आपली विकेट गमावली. या मालिकेत कोहलीचा हा सलग दुसरा शून्य (डक) ठरला असून, एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत पहिल्यादाच त्याच्या नावावर अशी लाजिरवाणी कामगिरी नोंदवली गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ॲडलेड ओव्हल, जे कोहलीसाठी नेहमीच भाग्यवान ठरले आहे, त्या मैदानावरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या फॉरमॅटमधील हा त्याचा पहिला 'डक' आहे. कोहलीच्या फॉर्ममधील सातत्याचा अभाव सध्या भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संयमी पाठलाग आणि झम्पाची कमाल

भारताच्या २६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला संथ सुरुवात केली. पण मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांनी डाव सावरला. मधल्या फळीत मिचेल ओवेननेही काही महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडत असतानाही त्यांनी संयम राखला आणि अखेरीस २६५/८ धावा करत २२ चेंडू बाकी असताना २ विकेट्सने विजय निश्चित केला.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो फिरकी गोलंदाज ॲडम झम्पाने. झम्पाने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना जखडून ठेवत ४ बळी घेतले आणि तो सामनावीर ठरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ही एकदिवसीय मालिका २-० ने जिंकून आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

SCROLL FOR NEXT