India vs Australia Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 2nd ODI: बुमराहच्या जागेवर 'या' खेळाडूला संधी, तर स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, पाहा 'प्लेइंग-11'

India vs Australia, 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी दुसरा वनडे सामना होत असून हा सामना जिंकून भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 2nd ODI Match, Playing XI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (24 सप्टेंबर) वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुपलब्ध आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. बुमराह छोटी सुट्टी घेऊन त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या वनडेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टीव्ह स्मिथ करणार आहे. कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय मार्कस स्टॉयनिस आणि मिचेल मार्शही या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जोश हेजलवूड, ऍलेक्स कॅरे आणि स्पेन्सर जॉन्सन यांना संधी दिली आहे. जॉन्सनचा हा वनडे पदार्पणाचाही सामना आहे.

भारताला मालिका विजयाची संधी

इंदूरला होणारा हा दुसरा वनडे सामना भारताने जिंकला, तर भारतीय संघ मालिकाही खिशात घालेल. कारण भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने जर सामना जिंकला, तर मालिकेत १-१ अशी बरोबरी होईल आणि राजकोटला २७ सप्टेंबर रोजी होणारा सामना निर्णायक ठरेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन-

  • भारत - शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: काँग्रेसच्या नेत्यांनीच केले होते विरियातोंविरोधात काम!

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT