Ruturaj Gaikwad - Shubman Gill ran four runs between wickets:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहालीला झाला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 277 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना सलामीला शतकी भागीदारी रचली.
दरम्यान, ते फलंदाजी करताना एक दुर्मिळ घटना घडली. 9 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या दोघांनी मिळून चक्क पळून ४ धावा काढल्या.
झाले असे की 9 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीन गोलंदाजाली आला होता. ग्रीनने गुड लेंथचा मधल्या स्टंपवर चेंडू टाकला. त्यावर गिलने मिड-विकेटच्या दिशने चेंडू फटकावला.
त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी धावला, त्याने मोठ्या कसोशीने चौकार आडवला आणि तो परत खेळपट्टीकडे थ्रो केला. पण तोपर्यंतर गिल आणि ऋतुराज यांनी चार धावा पळून काढल्या होत्या.
गमतीची गोष्ट अशी की त्यानंतर तो चेंडू सीमारेषेपार गेला आहे की नाही, हे रिप्लेमध्ये तपासण्यात आले, पण क्षेत्ररक्षकाने चेंडू चौकारापासून आडवला होता. मात्र, असे असले तरी गिल-ऋतुराज चार धावा धावल्याने भारताच्या खात्यात चार धावा जोडल्या गेल्या.
खरंतर क्रिकेटमध्ये दोन फलंदाजांमध्ये एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी धावा धावणे साधारण बाब आहे, मात्र फार क्वचित फलंदाजांकडून पळून चार धावा काढल्या जातात.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास ऋतुराज आणि गिल यांनी सलामीला 142 धावांची भागीदारी केली. या दोघांनाही ऍडम झम्पाने बाद केले. ऋतुराजने 71 धावांची आणि गिलने 74 धावांची खेळी केली.
तसेच केएल राहुल (58*) आणि सूर्यकुमार यादव (50) यांनीही अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारताने 48.4 षटकातच 5 विकेट्स गमावत 281 धावा करत आव्हान पूर्ण केले.
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 276 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली होती. तसेच जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या होत्या. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.