Shubman Gill | Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: धडाकेबाज! शतकवीर गिल-अय्यरने ऑस्ट्रेलियाला झोडपत सचिन-लक्ष्मणलाही टाकलं मागे

Shreyas Iyer - Shubman Gill: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी शतके साजरी केली आहेत

Pranali Kodre

India vs Australia 2nd ODI at Indore Shreyas Iyer Shubman Gill century:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना इंदूरला होळकर क्रिकेट स्टेडियमवर रविवारी होत आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी केली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे सलामीला आले. पण ऋतुराज 8 धावांवरच बाद झाला.

मात्र, त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. पावसाचा काही वेळासाठी व्यत्यय आलेल्या या डावात या दोघांनीही चौकार षटकारांची बरसात करत शतके साजरी केली. याबरोबरच त्यांनी 200 धावांची भागीदारीही केली.

श्रेयसने 86 चेंडूत त्याचे तिसरे वनडे शतक पूर्ण केले. मात्र, शतक केल्यानंतर लगेचच त्याला 101 धावांवर जीवदान मिळाले होते.

मात्र, या जीवदानाचा त्याला नंतर फायदा घेता आला नाही आणि तो 105 धावांवर 31 व्या षटकात बाद झाला. त्याने 90 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर गिलने आपली लय कायम ठेवली आणि 92 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह शतक साजरे केले. गिलचे हे वनडे क्रिकेट कारकिर्दीतील 6 वे शतक ठरले. पण तोह शतक केल्यानंतर 104 धावांवर बाद झाला.

श्रेयस - गिलने रचले विक्रम

दरम्यान, श्रेयस आणि गिल यांनी 200 धावांची भागीदारी करत मोठा विक्रमही केला आहे. त्यांनी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे.

त्यांनी या यादीत सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या जोडीला मागे टाकले आहे. सचिन आणि लक्ष्मण यांनी इंदूरलाच 2001 साली 199 धावांची भागीदारी केली होती.

भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मायदेशात सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्या

  • 200 धावा - शुभमन गिल - श्रेयस अय्यर (इंदूर, 2023)

  • 199 धावा - सचिन तेंडुलकर - व्हीव्हीएस लक्ष्मण (इंदूर, 2001)

  • 193 धावा - रोहित शर्मा - शिखर धवन (मोहाली, 2019)

याशिवाय गिल आणि अय्यर इंदूरमध्ये वनडेत द्विशतकी भागीदारी करणारी दुसरीच जोडी ठरली आहे. यापूर्वी गिलने रोहित शर्माबरोबर याचवर्षी न्यूझीलंडविरुद्ध 212 धावांची भागीदारी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT