Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja: पडदा उठला! जडेजाने बोटाला नक्की लावलं काय? टीम इंडियाकडून खुलासा

नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी जडेजा त्याच्या हाताच्या बोटाला काहीतरी चोळताना दिसत होता, आता याबद्दल भारतीय संघाकडूनच माहिती देण्यात आली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरला सुरू आहे. 9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाचा हाताच्या बोटाला काहीतरी चोळत असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण आता या व्हिडिओबद्दल भारतीय संघाकडून खुलासा करण्यात आला आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रकरणाबाबत सामनाधिकारी अँड पायक्रॉफ्ट यांना कळवले आहे की जडेजा त्याच्या बोटाला पेन-रिलीफ क्रिम लावत होता.

सोशल मीडियावर 9 फेब्रुवारीला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जडेजा ज्या हाताने गोलंदाजी करतो, त्या डाव्या हाताच्या बोटाला काहीतरी चोळताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये दिसते की जडेजा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून काहीतरी घेऊन त्याच्या बोटाला चोळत होता.

त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने 5 बाद 120 धावा केल्या होत्या. तसेच मार्नस लॅब्युशेन, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा हे पाच प्रमुख फलंदाज बाद झालेले होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्यावर काही युजर्सने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. विशेषत: ऑस्ट्रेलियन मीडियाकडून त्याच्यावर निशाणा साधण्यात आला होता.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर पायक्रॉफ्ट यांनी हे प्रकरण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि जडेजा यांच्या निदर्शनास आणून दिले. क्रिकेट नियमांनुसार जर एखादे प्रकरण गंभीर वाटत असेल, तर स्वत: सामनाधिकारी त्याचा स्वतंत्रपणे तपासणी करू शकतात.

दरम्यान, पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघाला याबद्दल कळवल्यानंतर लगेचच संघव्यवस्थापनाने जडेजा पेन रिलीफ क्रिम लावत असल्याचे स्पष्ट केले. पायक्रॉफ्ट यांनी या प्रकरणात अद्यापतरी जडेजाविरुद्ध कोणतेही आरोप लावले नाहीत. तसेच ऑस्ट्रेलियन संघानेही कोणतीही अधिकृत तक्रार याबाबत केलेली नाही.

जडेजाचे यशस्वी पुनरागमन

जडेजाने नागपूर कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 5 महिन्यांनी पुनरागमन केले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून सावरत असल्याने त्याला 5 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. पण आता तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेत त्याचे पुनरागमन यशस्वीही केले. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेन, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी यांना बाद केले. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर संपवण्यात भारताला यश मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT