R Ashwin Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: केएल राहुलने जिंकला टॉस! अश्विन, स्मिथ, कमिन्ससह दिग्गजाचे कमबॅक, पाहा 'प्लेइंग-11'

India vs Australia, 1st ODI: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत नाणेफेक जिंकली असून अनेक खेळाडूंचे या सामन्यातून पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

India vs Australia 1st ODI Playing XI :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली असून पहिला सामना मोहालीत होणार आहे. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून वनडे संघात आर अश्विनचे जवळपास दीड वर्षांनी पुनरागमन झाले आहे. त्याने अखेरचा वनडे सामना यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये खेळला होता.

तसेच श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी अशा खेळाडूंही प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. दरम्यान, या सामन्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली अशा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असल्याने भारताचे नेतृत्व केएल राहुल करत आहे.

त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होते. मात्र, आता ते खेळण्यास सज्ज आहेत.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी होणारी ही अखेरची वनडे मालिका आहे. त्यामुळे यादृष्टीनेही या मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पहिल्या वनडेसाठी असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Goa Politics: खरी कुजबुज; जनता दरबारात खोडा घालण्‍यासाठी रॅली?

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Goa Live News Updates: मांद्रे मधलामाज पुलाजवळ मागच्या तीन दिवसापासून जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

SCROLL FOR NEXT