IND vs AUS ODI: वर्ल्डकपआधी कांगारुंशी दोन हात करणार टीम इंडिया, पाहा पूर्ण वेळापत्रक

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
India vs Australia
India vs Australia Dainik Gomantak

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला आता केवळ २ आठवड्यांचा कालावधी राहिला आहे. अशात सहभागी संघांची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, या वर्ल्डकपपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात महत्त्वपूर्ण ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.

वनडे वर्ल्डकपपूर्वी होणारी ही अखेरची वनडे मालिका असणार आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही तीन सामन्यांची मालिका २७ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या मालिकेदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात वनडेत अव्वल क्रमांकावर पोहचण्यासाठीही ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला असून सराव करत आहे. तसेच भारतीय संघही या मालिकेसाठी सज्ज आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीने या मालिकेसाठी उतरणार आहे, तर भारताने पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव अशा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

India vs Australia
IND vs AUS: भारताविरुद्ध ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा, स्मिथ-कमिन्ससह 'या' दिग्गजांचेही कमबॅक

त्यामुळे पहिल्या दोन वनडेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर रविंद्र जडेजा उपकर्णधार आहे. तसेच पहिल्या दोन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा खेळाडूंनाही संघात संधी दिली आहे, या खेळाडूंचा चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय क्रिकेट संघात समावेश आहे.

त्यामुळे हे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन सामने झाल्यानंतर चीनला रवाना होतील. त्याचबरोबर तिसऱ्या वनडेसाठी मात्र भारतीय संघात विराट, रोहित, कुलदीप यांचे पुनरागमन होणार आहे.

या वनडे मालिकेसाठी आर अश्विनचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जर त्याला खेळण्याची संधी मिळाली, तर तो तब्बल दीडवर्षांनी भारताकडून वनडे खेळताना दिसेल.

या मालिकेतील तिन्ही वनडे सामने २२, २४ आणि २७ सप्टेंबर रोजी खेळवले जाणार असून अनुक्रमे मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे होणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहेत.

India vs Australia
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' दिग्गजाला मिळाली संधी

भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेचा वेळापत्रक

22 सप्टेंबर 2023 - पहिला वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

24 सप्टेंबर 2023 - दुसरा वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

27 सप्टेंबर 2023 - तिसरा वनडे सामना (वेळ- दु. 1.30 वाजता)

भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), सिन ऍबॉट, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com