KL Rahul | Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: मोहालीत रंगणार भारत - ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या वनडेचा थरार, कधी अन् कुठे पाहाणार मॅच?

Live Streaming Details: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारपासून वनडे मालिकेला सुरुवात होत असून लाईव्ह सामना कुठे पाहू शकता जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia, 1st ODI Live Streaming Details:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 22 सप्टेंबरपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. ही मालिका वनडे वर्ल्डकपच्या तोंडावर होत असल्याने त्यादृष्टीनेही या मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या मालिकेत विजय मिळवून वनडे क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर येण्याची दोन्ही संघांना संधी असणार आहे.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताने विराट कोहली-रोहित शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर तिसऱ्या सामन्यासाठी मात्र विश्रांती देण्यात आलेले खेळाडू पुनरागमन करतील. दरम्यान रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन सामन्यात भारताचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया संघातून कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल असे खेळाडू दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिसणार आहेत.  

या मालिकेतील सामने मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे अनुक्रमे २२, २४ आणि २७ सप्टेंबर रोजी खेळवले जाणार आहेत.

पहिला सामन्याचा तपशील

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे.

कुठे आणि कसा पाहाणार सामने?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना टीव्हीवर चाहत्यांना स्पोर्ट्स १८ चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्षेपण जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

यातून निवडले जाणार प्लेइंग इलेव्हन -

  • ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), सिन ऍबॉट, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

  • भारतीय संघ - केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; ठावठिकाणा जाहीर न करण्याचा गृह मंत्रालयाचा आदेश

Panaji Waste Management: पणजीतील कचरा व्यवस्थापन ठरणार प्रेरणादायी! स्मार्ट सिटीच्या प्रमुखांचे गौरोद्गार

Cash For job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणातील संशयित शिवम पाटीलला कोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

Goa Live Updates Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक; मतदानाला सुरुवात

Rashi Bhavishya 20 November 2024: आज तुमचा प्रवास घडणार आहे, आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT