IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन!

IND vs AUS 1st ODI Playing 11: भारताने शानदार कामगिरी करत आशिया कप-2023 जिंकला. आता टीम इंडियासमोर कडवे आव्हान आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs AUS 1st ODI Playing 11: भारताने शानदार कामगिरी करत आशिया कप-2023 जिंकला. आता टीम इंडियासमोर कडवे आव्हान आहे. टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम संघांमध्ये गणले जातात. अशा परिस्थितीत मोठ्या स्पर्धेपूर्वी ते एकमेकांविरुद्ध खेळले तर तयारी चांगली होईल. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताने आपला कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव यांना विश्रांती दिली आहे. अशा स्थितीत संघाची कमान केएल राहुलच्या हाती आहे आणि राहुलसमोर सर्वोत्तम प्लेइंग-11 निवडण्याचे आव्हान आहे.

दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांसाठी राहुलला संघाचा कर्णधार, तर रवींद्र जडेजाला संघाचा उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र, तिसऱ्या सामन्यातून रोहित, कोहली, पंड्या आणि कुलदीप परतणार असून कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा रोहितकडे असेल.

Team India
IND vs AUS ODI: वर्ल्डकपआधी कांगारुंशी दोन हात करणार टीम इंडिया, पाहा पूर्ण वेळापत्रक

कोणत्या फलंदाजांना संधी मिळणार?

या सामन्यात भारताची सलामीची जोडी फिक्स झालेली दिसते. इशान किशन शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करेल. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादव यांना संधी मिळू शकते. तर कर्णधार केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आणि श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. यानंतर रवींद्र जडेजा येईल. प्रदीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करणारा रविचंद्रन अश्विनही या सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. अक्षर पटेलच्या जागी अश्विनला संधी देण्यात आली असून संघ व्यवस्थापनाने त्याच्याबाबत केलेली वक्तव्ये पाहता तो खेळणार हे निश्चित असल्याचे दिसते.

भारत किती गोलंदाजांसह मैदानात उतरेल?

या सामन्यात भारत किती गोलंदाज मैदानात उतरणार हे पाहायचे आहे. भारताने पाच गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतल्यास, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आणि मग टीम इंडिया जडेजा आणि अश्विनसारख्या दोन फिरकी गोलंदाजांसह जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या तीन वेगवान गोलंदाजांची निवड करु शकते. पण जर संघाला अतिरिक्त गोलंदाज सोबत जायचे असेल तर तिलक किंवा सूर्या एकतर खेळतील आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग-11 मध्ये संधी मिळेल. जर विकेट वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल तर सुंदरच्या जागी मोहम्मद शमी संघात येऊ शकतो. मोहालीची खेळपट्टी पाहता टीम इंडिया अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देऊ शकते.

Team India
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' दिग्गजाला मिळाली संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11

केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), शुभमन गिल, इशान किशन, तिलक वर्मा/सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com