Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 1st ODI: चार वेगवान अन् दोन स्पिनर्सला टीम इंडियात संधी, पाहा दोन्ही संघांची Playing XI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून वनडे मालिकेला होत असून पहिल्या सामन्यासाठी रविंद्र जडेजा, केएल राहुलचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेनंतर आता शुक्रवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे.

पहिल्या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे खेळणार नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी हार्दिक पंड्या या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिलसह ईशान किशन सलामीला फलंदाजी करणार असल्याचे हार्दिकने स्पष्ट केले आहे.

याशिवाय या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्याबरोबर हार्दिक अशा चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. तसेच फिरकी गोलंदाजीसाठी रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे दोन पर्याय असतील.

जडेजा या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्येही पुनरागमन करेल. त्याचबरोबर केएल राहुलचेही पुनरागमन झाले असून तो मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. त्याच्यासह मधल्या फळीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे देखील असतील.

दरम्यान, या मालिकेला ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सही मुकणार असल्याने स्टीव्ह स्मिथ नेतृत्वाची जबाबदारी संभाळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल यांचेही पुनरागमन झाले आहे.

याशिवाय डेव्हिड वॉर्नर सध्या दुखापतीतून सावरत असल्याने त्याला या सामन्यासाठी संधी देण्यात आली नाही, त्यामुळे त्याच्या जागेवर मिशेल मार्श ट्रेविस हेडसह सलामीला फलंदाजी करणार असल्याचे स्मिथने स्पष्ट केले आहे. तसेच ऍलेक्स कॅरीला बरे नसल्याने तो मायदेशी परता असल्याचेही स्मिथने सांगितले आहे. त्यामुळे जोश इंग्लिस यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.

असे आहेत दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ - शुभमन गिल, इशान किशन(यष्टीरक्षण), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या(कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया संघ - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन ऍबॉट, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POGO Bill: 20 डिसेंबर 1961 पूर्वी जे गोव्यात होते तेच खरे गोमंतकीय, 'त्यांचे' हित जोपासणार तरी कधी?

Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांनी घाई ‘त्‍या’साठी केली?

Goa Assembly: ‘गोमंतक मराठा’वर प्रशासक नेमण्‍यात सरकारचा हात नाही! गावडेंच्या प्रश्नाला CM सावंतांचे उत्तर

Ganesh Chaturthi: 'गणेश चतुर्थी राज्य महोत्सव जाहीर करा'! आमदार साळकरांची मागणी; अध्यात्मिक पर्यटनांतर्गत आणण्याचा प्रस्ताव

Sattari Theft: 1 नाही, 2 नाही.. तब्बल 5 दुकाने फोडली! केरी-सत्तरीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक चिंताग्रस्त

SCROLL FOR NEXT