Team India PTI
क्रीडा

IND vs AFG: सॅमसन करणार यष्टीरक्षण! तिसऱ्या T20I साठी दोन्ही संघाच्या प्लेइंग-11 मध्ये मिळून 7 बदल

India vs Afghanistan: अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 3rd T20I Match at Bengaluru, Playing XI :

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी (17 जानेवारी) होणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघात मिळून 7 बदल झाले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत.

अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले असून त्यांच्या जागेवर संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि आवेश खान यांना संधी देण्यात आली आहे. सॅमसन या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.

तसेच अफगाणिस्तानने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून नवीन-उल-हक, मुजीब उर रेहमान, फझलहक फारुकी आणि नूर अहमद यांना बाहेर केले आहे.

त्यांच्या जागेवर शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

भारत देणार व्हाइटवॉश?

चालू टी20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले असल्याने यापूर्वीच ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानला व्हाइटवॉश देण्याची संधी भारतीय संघाकडे आहे, तर अफगाणिस्तान प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने या सामन्यात विजय मिळवण्यासाठी खेळतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

भारत - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.

अफगाणिस्तान - रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT