Rohit Sharma - Sanju Samson PTI
क्रीडा

IND vs AFG: सॅमसन, कुलदीपला मिळणार संधी? शेवटच्या T20I सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान संघात तिसरा टी20 सामना बंगळुरुला बुधवारी होणार आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 3rd T20I Match at Bengaluru, Probable Playing XI:

बुधवारी (17 जानेवारी) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना होणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

या टी20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने यापूर्वीच ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत अफगाणिस्तानला व्हाइटवॉश देण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे, तर अफगाणिस्तान प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने या सामन्यात विजयासाठी प्रयत्न करेल.

दरम्यान, पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले असल्याने अखेरच्या सामन्यात भारतीय संघव्यवस्थापक बेंच स्ट्रेंथ आजमावून पाहाणार का, हा देखील प्रश्न आहे.

तसेच हा सामना भारताचा जूनमध्ये सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वीचा अखेरचा टी20 सामना आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्यादृष्टीनेही प्लेइंग इलेव्हन निवडताना विचार करू शकतात.

अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वालच कायम राहू शकतो. तसेच मधल्या फळीत विराट कोहली आणि रिंकू सिंग यांनाही कायम केले जाऊ शकते. त्याचबरोबर शिवम दुबे ज्या फॉर्ममध्ये खेळतोय, ते पाहाता अष्टपैलू म्हणून तो संघात कायम राहू शकतो.

मात्र जितेश शर्माच्या जागेवर यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. तसेच गोलंदाजी फळीतही दोन बदल केले जाऊ शकतात.

फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जागेवर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. कुलदीप पहिल्या दोन्ही सामन्यात खेळलेला नाही. त्याचबरोबर मुकेश कुमारच्या जागेवर आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले जाण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन -

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT