Team India PTI
क्रीडा

मोहालीत रंगणार IND vs AFG पहिल्या T20I सामन्याचा थरार! काय आहे हवामान अंदाज, घ्या जाणून

India vs Afghanistan: भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी20 सामना मोहालीत होणार आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 1st T20I Match at Mohali, Weather Report:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारपासून (11 जानेवारी) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियम येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे.

सध्या काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

दरम्यान, मोहालीमध्ये गुरुवारी पावसाची शक्यता नाही. मात्र, वातावरण थंड राहणार आहे. AccuWeather च्या रिपोर्टनुसार गुरुवारी मोहालीतील दिवसा तापमान १९ डिग्री सेल्सियस असू शकते. तसेच रात्री तापमान ३ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते.

याशिवाय सामन्याच्या वेळेत हवेतील आद्रता ५५ ते ७० टक्के असू शकते. त्यामुळे या सामन्यात दवाचाही परिणाम दिसू शकतो.

आमने-सामने आकडेवारी

दरम्यान, ही मालिका भारतीय संघाची जूनमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी होणारी अखेरची टी२० मालिका आहे.

इतकेच नाही, तर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध पहिलीच द्विपक्षीय मालिका खेळत आहे. आत्तापर्यंत या दोन संघात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळून ५ टी२० सामने झाले आहेत. यातील ४ सामने भारताने जिंकले आहेत, तर १ सामना अिर्णित राहिला आहे.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

  • अफगाणिस्तान- इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

SCROLL FOR NEXT