Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

'...तर निर्णय बेफिकिरीचे ठरू शकतात', IND vs PAK सामन्यापूर्वी हार्दिकचं मोठं भाष्य

Pranali Kodre

India vice-captain Hardik Pandya react on match against Pakistan in Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेतील कँडीमध्ये खेळवला जाणार आहे.

या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असली, तरी भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने म्हटले आहे की भावनांमध्ये वाहून चालणार नाही, तर विचार करून निर्णय घ्यावे लागणार आहेत.

हार्दिकने त्याला या सामन्याबद्दल उत्सुकता का असते, याबद्दलही खुलासा केला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, 'ही एक अशी स्पर्धा आहे, जिथे खेळाडूचे व्यक्तीमत्त्व आणि गुणधर्म तपासले जातात. त्याचबरोबर तुम्ही किती खोल पाण्यात पोहू शकता, हे देखील पाहू शकता. माझ्यासाठी या सर्व गोष्टी आहेत, ज्या मला उत्तेजित करतात.'

'चाहत्यांशी अनेक भावना जोडलेल्या आहे. पण आमच्यासाठी ही बाब म्हणजे एका चांगल्या संघाविरुद्ध खेळणे आहे. नजीकच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या एका चांगल्या संघाविरुद्ध आम्हाला सामना खेळायचा आहे.'

त्याबरोबर भावनांपेक्षा विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असेही पंड्या म्हणाला. पंड्या म्हणाला, 'आम्ही बाहेरच्या भावना बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि चांगले क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रीत करतो. आम्ही खूप भावनिक होऊ शकत नाही, कारण अशावेळी काही निर्णय बेफिकीरीचे ठरू शकतात, ज्यावर माझा विश्वास नाही. त्याचबरोबर ही मोठी स्पर्धाही आहे.'

आशिया चषक ही आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. त्याचमुळे या स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे वनडे प्रकाराशी जुळवून घेणे आणि तशी मानसिकता तयार करणेही महत्त्वाचे ठरणार असल्याचे पंड्याने सांगितले.

तो म्हणाला, 'तुम्ही विचार केला, त्यापेक्षा तुमच्याकडे अधिक वेळ आहे. हा असा खेळ आहे, जो तुम्हाला स्विकारावा लागेल, तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल, कारण हा खेळ ५० षटकांचा असणार आहे आणि तुम्हाला एका चांगल्या संघाविरुद्ध जिंकण्यासाठी १०० षटके चांगले क्रिकेट खेळावे लागणार आहे.'

एक क्रिकेटपटू म्हणून माझी मानसिकता तेव्हाच बदलते, जेव्हा मी वनडे क्रिकेटच्या मागणीनुसार तयारीला सुरुवात करतो. जर तयारी योग्य असेल, तर मी फक्त तिथे जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतो.'

'अर्ध्यावेळा परिस्थिती सर्व स्वत:च ठरवते, त्यामुळे तुम्हाला रॉकेट सायन्स वापरण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त सामना नीट पाहायचा असतो. काय होत आहे, हे समजून घ्यायचे असते आणि कदाचीत एखादा स्मार्ट निर्णय घ्यायचा असतो.'

दरम्यान, हार्दिक आशिया चषकात मधल्या फळीत फलंदाजी करण्याबरोबर गोलंदाजी करतानाही दिसू शकतो. भारत आणि पाकिस्तान संघातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT