Ravindra Jadeja X/BCCI
क्रीडा

SA vs IND: जड्डूचं कमबॅक? दुसऱ्या कसोटीपूर्वी BCCI ने शेअर केलेल्या व्हिडिओतून संकेत

Ravindra Jadeja: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दुसरा कसोटी सामना नवीन वर्षाच्या सुरुवातीला खेळवला जाणार असून त्याआधी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town:

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील भारताचा अखेरचा कसोटी सामना बाकी आहे. हा सामना ३ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान केपटाऊनला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे.

भारतीय संघाच्या सरवाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिध कृष्णा, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार असे अनेक खेळाडू सराव करताना दिसत आहे.

दरम्यान, जडेजाही नेटमध्ये घाम गाळत असल्याने तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जडेजा पहिल्या कसोटीत पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याला पहिल्या सामन्यापूर्वी पाठीमध्ये वेदना असल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते.

मात्र, आता जडेजा सरावासाठी परतला आहे. त्यामुळे तो पूर्ण फिट असल्याचे म्हटले जात आहे. त्याला दुसऱ्या कसोटीसाठी आर अश्विनच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. त्याच्या संघात येण्याने फलंदाजीतही सखोलता प्राप्त होईल.

शार्दुलला दुखापत

भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला सरावादरम्यान खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यावरही मोठे प्रश्नचिन्ह आहे. तो फलंदाजीचा सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती. तथापि त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मात्र, जर त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही, तर त्याच्या जागेवर मुकेश कुमार किंवा आवेश खानला संधी दिली जाऊ शकते.

भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकला असल्याने त्यांनी दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिका जिंकण्याची संधी नाही.

मात्र भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवू शकतात. दुसरा सामना जर भारतीय संघ पराभूत झाला किंवा अनिर्णित राहिला, तर दक्षिण आफ्रिका ही मालिका जिंकेल.

  • दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT