भारतीय क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या जाहीर केलेल्या केंद्रिय वार्षिक करारातही त्यांची निवड झालेली नाही.
त्यांनी भारतीय संघातून बाहेर असताना तंदुरुस्त असूनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग न नोंदवल्याने त्यांच्यावर बीसीसीआय नाराज असल्याचे समजले होते. तसेच याच कारणामुळे त्यांना केंद्रिय करारही न मिळाल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते.
आता अशी माहिती समोर येत आहे की इशान किशनशी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान संपर्क साधण्यात आला होता, परंतु त्याने तो अद्याप खेळणार नसल्याचे होते.
याबद्दल इएसपीएन क्रिकइन्फोने वृत्त दिल आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापनाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान संपर्क केला होता. पण इशानने त्यांना सांगितले की तो अद्याप तयार नाही.
खरंतर डिसेंबर 2023 च्या अखेरीस इशान भारतीय संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. पण हा दौरा सुरू असतानाच त्याने मानसिक थकव्याच्या कारणाने माघार घेतली आणि तो मायदेशी परतला. त्यानंतर तो एकदाही भारतीय संघाकडून किंवा त्याचा राज्य संघ झारखंडकडून खेळला नाही.
तसेच तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही गेला नाही. तो त्याचाच वैयक्तिक सराव करताना दिसला होता. दरम्यान, आता तो डी.वाय.पाटील टी20 स्पर्धा या स्थानिक स्पर्धेत खेळत आहे. तसेच लवकरच 23 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत फारशी चांगली कामगिरी करू न शकल्याने भारतीय संघव्यवस्थापनाने 23 वर्षीय ध्रुव जुरेलला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळवले. त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी पकडत आपली छाप पाडली आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या मोठ्या निर्णयानंतर आता 2 मार्चपासून सुरु झालेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईकडून श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे. त्याला यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाकडून खेळवण्यात आले होते.
परंतु, त्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. दरम्यान, बीसीसीआयच्या मेडिकल टीमने तो तंदुरुस्त असल्याचा अहवाल दिला असतानाही तो मुंबईसाठी रणजी ट्रॉफीतील सामन्यांसाठी उपलब्ध राहिला नव्हता. त्याचमुळे त्याने बीसीसीआयची नाराजी ओढून घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता तो उपांत्य सामन्यात मुंबई संघासाठी खेळताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.