Yashasvi Jaiswal - Shubman Gill X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, Test: जयस्वालचं दणदणीत शतक, तर गिलचीही फिफ्टी! तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी

India vs England, 3rd Test: भारताच्या गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर जयस्वालने शतक, तर शुभमन गिलने अर्धशतक ठोकत तिसऱ्या दिवस गाजवला.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test at Rajkot, 3rd Day review:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात राजकोटमध्ये चालू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्या आहेत.

भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने शतक केले, तर शुभमन गिलने नाबाद अर्धशतक केले. या दोघांमध्ये दीडशतकी भागीदारीही झाली.

तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडला पहिल्या डावात सर्वबाद केल्यानंतर 126 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने सुरुवातीला संयमी खेळ केला होता.

मात्र पहिल्या डावातील शतकवीर रोहितला फार काळ जो रुटने टिकू दिले नाही. त्याला 12 व्या षटकात जो रुटने पायचीत केले. त्यानंतर मात्र जयस्वाल आणि शुभमन गिलची जोडी जमली. एक बाजू गिलने सांभाळली असताना जयस्वालने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना स्थिर होण्याची संधीच दिली नाही.

२७ व्या षटकात तर जयस्वालने जेम्स अँडरसनविरुद्ध सलग तीन चेंडूत एक षटकार आणि दोन चौकार ठोकले. त्याने आक्रमक खेळताना 122 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. मात्र शतकानंतर पाठीमध्ये त्याला वेदना जाणवत होत्या. फिजिओने मैदानात येत त्यावर उपचार देखील केले. पण तो पुन्हा माघारी जाण्यास तयार नव्हता.

अखेर त्याच्या वेदना कमी होत नसल्याने तो रिटायर्ड हर्ट होऊन परत गेला. त्याला भारतीय संघाकडून परत येण्यास मनवले असल्याचे समालोचकांमध्ये चर्चा झाली. जयस्वाल रिटायर्ड हर्ट झाला, तेव्हा त्याने 133 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 104 धावा केल्या होत्या.

दरम्यान, तो माघारी परतल्यानंतर रजत पाटीदार फलंदाजीला आला होता. पण 48 व्या षटकात टॉम हर्टलीने टाकलेल्या एका शानदार चेंडूवर तो बाद झाला. रजतला धावांचे खातेही उघडला आले नाही.

त्यानंतर कुलदीप यादव नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला. यानंतर मात्र दिवसअखेरपर्यंत भारताने विकेट गमावली नाही. कुलदीप 3 धावांवर, तर गिल 65 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून जो रुट आणि टॉम हर्टली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, तिसऱ्या या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 36 व्या षटकापासून आणि 2 बाद 207 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी शतकी खेळी करणारा बेन डकेट आणि जो रुट नाबाद खेळत होते.

मात्र, जो रुटला 18 धावांवर जसप्रीत बुमराहने बाद केले. पाठोपाठ जॉनी बेअरस्टोही शुन्यावर बाद झाला. यानंतर डकेटने आपला खेळ सुरू ठेवला होता. मात्र दीडशतकानंतर त्याला कुलदीप यादवने बाद केले. डकेटने 151 चेंडूत 153 धावांची दीडशतकी खेळी केली. या खेळीत त्याने २३ चौकार आणि २ षटकार मारले.

तो बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि बेन फोक्सने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते देखील चांगल्या सुरुवातीनंतर लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्याने इंग्लंडला मोठे धक्के बसले. स्टोक्स 41 धावांवर आणि फोक्स 13 धावांवर बाद झाला.

यानंतर मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाने इंग्लंडचे शेपूट झटपट गुंडाळले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 71.1 षटकात सर्वबाद 319 धावाच करता आल्या.

भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजीत मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 130.5 षटकात सर्वबाद 445 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी सोमवारी गोव्यात येतोय", पुण्यातला 'तो' पर्यटक देणार कळंगुट पंचायतीला उत्तर; Watch Video

Porvorim Mapusa: सरकारचे 'साबांखा' खाते गुंडाळून ठेवण्याची गरज! पर्वरी-म्हापसा रोडवरून आप आक्रमक; बाईक राईड काढून निषेध

Shramdham Yojana: ‘श्रमधाम’मधून 100 घरे बांधणार! तवडकरांची घोषणा; 10 हजार कार्यकर्ते जोडणार

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

SCROLL FOR NEXT