Ind Vs NZ 5th T20 Dainik Gomatnak
क्रीडा

Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

Ind Vs NZ 5th T20: पहिल्या तीन सामन्यांत शानदार विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला बुधवारी झालेल्या चौथ्या सामन्यात ५० धावांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

विशाखापट्टणम: टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी आम्ही गोलंदाजांना कठीण आव्हानांचा सामना करता यावा, याची परीक्षा घेतली म्हणूनच जाणीवपूर्वक पाच गोलंदाजांना संधी दिली, अशी माहिती भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यानंतर दिली.

पहिल्या तीन सामन्यांत शानदार विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला बुधवारी झालेल्या चौथ्या सामन्यात ५० धावांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय गोलंदाजीचा समाचार घेताना सात बाद २१५ धावा केल्या.

या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने फॉर्मात असलेल्या ईशान किशनला विश्रांती दिली होती. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे असे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय असतानाही त्यांना गोलंदाजी दिली नाही. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव याच पाच गोलंदाजांनाच

गोलंदाजी दिली.

प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पहिला बदल म्हणून गोलंदाजीस आणले आणि अर्शदीप सिंग व हर्षित राणा यांच्याकडून आक्रमणाची सुरुवात केली, परंतु डेव्हन कॉनवे आणि टीम सैफर्ट यांनी आठ षटकांतच शतकी सलामी दिली.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात असलेल्या खेळाडूंना आम्ही या चौथ्या सामन्यासाठी प्राधान्य दिले. नाहीतर श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंना संधी दिली असती, असे सूर्यकुमारने सामन्यानंतर सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT