India Test Team  Dainik Gomantak
क्रीडा

India's Tour of West Indies: टीम इंडियाची घोषणा! जयस्वाल, ऋतुराजला पहिल्यांदाच कसोटीत संधी

वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

India squads for Tests and ODI series against West Indies: भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी20 आशा तिन्ही प्रकारातील मालिका खेळणार आहे.

या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होईल. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

वनडे आणि कसोटी या दोन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे. दरम्यान, कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रहाणे जवळपास दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा कसोटी उपकर्णधार बनला आहे. तसेच वनडेचे उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे कायम आहे.

याशिवाय भारताच्या कसोटी संघात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसेच चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे खेळाडू कसोटी संघातून वगळण्यात आले आहेत.

दरम्यान, कर्णधार रोहित शिवाय विराट कोहली, शुभमन गिल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, इशान किशन, मोहम्मद सिराज हे खेळाडू कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात आहेत.

यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना देखील वनडे आणि कसोटी अशा दोन्ही संघात संधी देण्यात आली आहे.

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, सुर्यकुमार यादव यांना केवळ वनडे संघात स्थान मिळाले आहे.

  • भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

  • भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

असा आहे वेस्ट इंडिज दौरा

बीसीसीआयने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT