India Squad For Sri Lanka Test Series Dainik Gomantak
क्रीडा

India Squad For Sri Lanka Test Series: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जडेजाचं पुनरागमन, वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीतून बाहेर

India squad for Sri Lanka Test series 2026: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या या संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले असून, वॉशिंग्टन सुंदरला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळालेले नाही. तसेच मध्य प्रदेशचा युवा अष्टपैलू सारांश जैन याला प्रथमच भारतीय कसोटी संघात संधी मिळाल्याने त्याची निवड चर्चेचा विषय ठरली आहे.

जडेजाचं पुनरागमन, नव्या खेळाडूंना संधी

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या रवींद्र जडेजाचा श्रीलंका दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला गुरनूर बरार यालाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यात त्याला अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या मानव सुथारलाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फिरकी विभागात भारताकडे जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार असे मजबूत पर्याय उपलब्ध असतील.

सारांश जैनची निवड ठरली चर्चेचा विषय

या संघातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू सारांश जैन. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफस्पिनर असलेल्या सारांशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 50 हून अधिक सामन्यांत 2,200 पेक्षा अधिक धावा करत 188 बळीही घेतले आहेत. त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

वेगवान गोलंदाजीवर भर

श्रीलंकेतील खेळपट्ट्यांचा विचार करूनही भारतीय संघात चार प्रमुख वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर बरार यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. फिरकी आणि वेगवान गोलंदाजीचा संतुलित मेळ साधण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न या निवडीतून दिसून येतो.

श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होईल, तर दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवला जाईल. भारतीय संघ 4 ऑगस्ट रोजी श्रीलंकेला रवाना होणार असून 7 ऑगस्टपासून कोलंबो येथे चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, मानव सुथार, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार आणि सारांश जैन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT