Anurag Thakur | Wushu Players Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: चीनने भारताच्या 3 खेळाडूंना प्रवेश नाकारल्यानंतर क्रीडामंत्र्यांनी उचलले मोठे पाऊल

Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनने अरुणाचल प्रदेशच्या तीन वुशू खेळाडूंना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

Pranali Kodre

India Sports Minister Anurag Thakur cancel China visit for Asian Games After three Arunachal Pradesh athletes visa denial:

चीनमधील होंगझाऊ येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेला २३ सप्टेंबरपासून अधिकृत सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच एक मोठा वाद समोर आहे.

चीनने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना प्रवेश देण्यास नकार दिला असल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे, यावर आता भारताचे केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला बिजिंग दौरा रद्द केला आहे.

अनुराग ठाकूर भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी चीनला जाणार होते. या स्पर्धेचा 23 सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

या स्पर्धेत भारताचे वुशू खेळाडू न्येमान वांग्सू, ओनिलु टेगा आणि मेपुंग लाम्गू या तीन खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला आहे. हे तिन्ही खेळाडू अरुणाचल प्रदेशचे रहिवासी आहेत.

यातील एका खेळाडूला एक्रिडिटेशन मिळाले होते, पण तिला हाँग काँग पुढे प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. तसेच दोन खेळाडूला एक्रिडिटेशन मिळाले नाही. या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 24 सप्टेंबरपर्यंत चीनला पोहचणे आवश्यक असणार आहे.

दरम्यान, चीनच्या म्हणण्यानुसार या खेळाडूंकडे योग्य कागदपत्रे नव्हती. पण हे खेळाडू अरुणाचल प्रदेशचे असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नसल्याची चर्चा आहे. कारण चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग मानतो.

तथापि, आशिया ऑलिम्पिक काउंसिलचे प्रभारी अध्यक्ष रणधीर सिंग यांनी हे प्रकरण चीन सरकारपर्यंत नेण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र, आशिया ऑलिम्पिक काउंसिलचे उपाध्यक्ष वेई जिजहोंग यांनी दावा केला आहे की भारतीय खेळाडूंना चीनमध्ये प्रवेशासाठी विसा देण्यात आला आहे, पण तो खेळाडूंनी स्विकारण्यास नकार दिला आहे.

या सर्व प्रकरणानंतर अनुराग ठाकूर यांनी बिजिंग दौरा रद्द केला आहे. याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की भारत सरकारने स्वत: हित जपण्यासाठी उपाय करण्याचा हक्क राखून ठेवलेला आहे. त्यांनी असेही सांगितले की चीनच्या कृत्याचा विरोध करण्यासाठी क्रीडामंत्री त्यांचा चीनचा दौरा रद्द करणार आहेत.

याशिवाय त्यांनी सांगितले आहे की भारत त्यांच्या नागरिकांना त्यांच्या वास्तव्यावरून किंवा वांशिकतेच्या आधारावर वेगळी वागणूक देण्याचा स्पष्टपणे विरोध करत आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की अरुणाचल प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT