Asian Games मध्ये शफाली वर्माची ऐतिहासिक फिफ्टी, 5 षटकारांसह रचला कोणालाच न जमलेला विक्रम

Shafali Verma: शफाली वर्माने एशियाडमध्ये पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे.
Shafali Verma
Shafali VermaDainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games India vs Malaysia Match, Shafali Verma Record:

गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मलेशियाविरुद्ध सामना झाला. मात्र, हा सामना सुरू असतानात पाऊस आल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय झाला. मात्र, या सामन्यात खेळताना भारताच्या शफाली वर्माने ऐतिहासिक विक्रम केला आहे.

या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 2 बाद 173 धावा केल्या होत्या. भारताकडून शफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने 39 चेंडूत 67 धावांची खेळी करताना 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक करणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.

Shafali Verma
Asian Games Volleyball: भारताने बलाढ्य द. कोरियाला पाजलं पाणी, बाद फेरीतही दणक्यात प्रवेश

याशिवाय तिने ही खेळी करताना 50 षटकारांचा टप्पाही पार केला आहे. तिचे आता 53 षटकार झाले आहे. त्यामुळे ती महिला आणि पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये मिळून सर्वात कमी वयात 50 षटकार मारणारी क्रिकेटपटू ठरली आहे.

तिने ही कामगिरी 19 वर्षे 236 दिवस वय असताना पूर्ण केली आहे. यापूर्वी हा विक्रम रेमनुल्लाह गुरबाझच्या नावावर होता, त्याने 20 व्या वर्षी अशी कामगिरी केली होती.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास शफालीने सलामीला कर्णधार स्मृती मानधनाबरोबर 57 धावांची भागीदारी केली. मानधना 27 धावांवर बाद झाली. त्यानंतर शफालीने जेमिमाह रोड्रिग्सबरोबर फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. पण अर्धशतकानंतर शफाली पायचीत झाला.

Shafali Verma
Asian Games 2023: पाऊस भारताच्या पथ्यावर, सामना रद्द होऊनही महिला क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये!

नंतर जेमिमाह आणि रिचा घोष यांनी मिळून भारताला 173 धावांपर्यंत पोहचवले. जेमिमाह 47 धावांवर आणि रिचा 21 धावांवर नाबाद राहिली.

मलेशियाकडून माहिरान इझ्झती इस्माईल आणि मास एलिसा यांनी मिळून प्रत्येकी १ विकेट घेतली. त्यानंतर मलेशियासमोर पावसामुळे 15 षटकांत 177 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

मात्र, मलेशिया संघ फलंदाजीला आल्यानंतर दोन चेंडूंचा खेळ झाला आणि पावसामुळे पुन्हा सामना थांबला. अखेर हा सामना रद्द झाल्यानंतर भारताच्या उच्च मानांकनामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com