Team India | India vs England Test Series | WTC 2023-25 PTI
क्रीडा

WTC Points Table: रांची कसोटी विजयानंतर टीम इंडियाचं दुसरं स्थान भक्कम, तर इंग्लंडचं टेन्शन वाढलं

India vs England Test Series: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथा सामना जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतील दुसरे स्थान आणखी मजबूत केले आहे.

Pranali Kodre

India solidate second spot in WTC 2023-25 points table:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचाही भाग आहे. दरम्यान या मालिकेतील चौथा सामना रांचीमधील जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर पार पडला, ज्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतही फायदा झाला आहे. भारताने या गुणतालिकेतील दुसरा क्रमांक भक्कम केला आहे. चौथ्या सामन्यापूर्वी भारताचे विजयी टक्केवारी 59.52 होती. पण आता रांचीतील कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताची टक्केवारी 64.58 अशी झाली आहे.

विजयी टक्केवारीनुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतील स्थान निश्चित केले जाते. त्यानुसार आता भारतीय संघ 64.58 च्या टक्केवारीसह न्यूझीलंडपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंड सध्या 75 च्या टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे. भारतापाठोपाठ या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांची 55 विजयी टक्केवारी आहे.

इंग्लंड संघाचे मात्र टेंशन या पराभवानंतर वाढले आहे. इंग्लंड आठव्या क्रमांकावर आहे. त्यांची टक्केवारी केवळ 19.44 आहे. त्यांच्या खाली फक्त श्रीलंका आहे. श्रीलंकेने अद्याप गुणांचे खातेच उघडलेले नाही.

दरम्यान, सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे तिसरे पर्व सुरू आहे. हे पर्व गेल्यावर्षी म्हणजेच 2023 च्या मध्यात चालू झाले असून 2025 मध्ये या पर्वाचा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारताचा विजय

रांची कसोटीत भारतासमोर इंग्लंडने 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार रोहित शर्माच्या (55) अर्धशतकानंतरही 120 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या.

परंतु, नंतर ध्रुव जुरेल (39) आणि शुभमन गिल (52*) यांनी केलेल्या 72 धावांच्या नाबाद भागीदारीने भारताच्या विजयावर 61 व्या षटकात शिक्कामोर्तब केले. तत्पुर्वी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 353 धावा केल्या होत्या, तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 307 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 46 धावांनी पिछाडी स्विकारावी लागली होती.

दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव 145 धावांवर संपुष्टात आला. पण पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी भारताला 192 धावांचे आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT